पान:रानवारा.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( घालून टाका व्यापायाला.' ' घेवारी पैसं कमी देत्याल.' गि-हाईकाला विकल्यावर किती मिळतील याचे ?" ( पंधरा-सोळा रूपयंतरी.' ( मला तिनं एका घेवान्याला ती कणसं धा रूपयंला इकायला लावली. आपली एक दहाची नोट त्यावर ठिवली. माझ्याम्होरं इस रूपयं धरलं. मी नको व्हय म्हणत हुतो पण घ्यालाच लावलं, पैसं घेतलं तेच बेस झालं. नाय, म्हणलं तरी तात्याला हिशोब द्याचा हुताच की. ‘चला.' तिच्या शब्दानं मी भानावर आलो. बैलगाडीत पाटी ठिवली. बैलांच्या पुढयात बाटुक टाकलं. निघालो. चालता चालता ती म्हणली, 'मी दवाखान्यात नर्सचं काम करते. बाळाला बाबा सांभाळतात.' तिच्या मागोमाग मी चाल्लो हुतो. चौकात परसू आण्णाचा शामा दिसला. त्वांडतरी कसं दडवू ? अगदी तोंडाम्होरचं उभा. त्येनं टवकारून पायलं. माघारी वळावं वाटलं पण चंदा सारखी मागं वळून बघायची. दाव्याची वढ लावल्यावाणी तिच्यामागं गेलो. दारात गोबरं, गोरपान बाळ उभं हुतं. चंदाकडं झॅप टाकून गेलं. त्ये मला बघून बाबारलं हुतं. ती म्हणाली, 4 अरे, ते तुझं बाबा आहेत.' माझ्या नाका-तोंडात पाणी गेल्यावाणी झालं. मी आवती भवती पायलं. खाटंवर तिचा बा हुता. माझ्याकडं बघून हासला. आता लई थकला हुता. हाडं व्हायली हुती नुसती. चंदानं मला बसायला खुर्ची दिली. मला आमच्या लग्नातली सय आली. त्या येळंला दोघं जोडीनं खुर्चीवर बसलो हुतो. आताबी जवळच टूलावर बसून ती बोलत हुती. नोकरी, बाळ, बाचा आजार, लोकांचा तरास आशाच इषयावर बक्कळ बोलत हुती. माझी नजर तिच्या खोलीभर फिरत हुती. बाळावर येऊन ठरत हुती. भित्तीवर बाळकिस्नाच्या फोटूला उदबत्त्या लावल्या हुत्या. चंदाच्या आई-बाचा फोटू हुता. चंदाचा एकबी नव्हता. फोटू काढायजोगती आसू नबी तिनं फोटू काढला नव्हता, आसं मातूर न्हवं. आमच्या लग्नातबी तिच्या दुबळा । ६६