पान:रानवारा.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घेतलं. मी दिलं. सही करताना हुंदका आला, बळीचा बकरा झालो म्हणून; पण रडलो नाय. सारं ' माझं ' त्ये संपलं हुतं. रडायला काईच शिल्लक नव्हतं. मनाची समजूत मनानं घातली. रावताळ्याच्या मळयात काम करीतच हुतो. वांड पोराच्या पायातल्या चेंडुवाणी सारी दुनियाच मला जणू लाथा घालायला टपली हुती. रावताळ्या आलिकडं लईच चेकाळून बोलायचा. झपाट्यानं काम करून राग आवरायचा परेत्न करायचो. तात्यानं मला खडसावलं हुतं, 'रामा, रावताळयाला उलट बोलू नगस. नाय तर पायतानानं टाळक्याचं कॅस काढीन.' नशीबाला बोल लावून दिवस काढीत हुतो. तात्यानं संगमावर लगीन लावून बायकू आणली. आजुळास्न प आणली. त्यावर एकादा महिनाच गेला आसंल. एक दिसी तात्या म्हणला, रामा, तुझं खोपाट वायलं उभं कर. तिला सान्यांचा संपाक करणं जमत नाय. तिला दिस गेल्यातीं. तू यगळं करून खा.' ( व्हय.' म्हणलं, गळ्यातला हुंदका गिळला. दोन दिवस मीच खोपाट उभं करण्याय राबलो. हातानं करून खाऊ लागलो; पण रावताळ्याची चाकरी सुटली नाय आन् तात्याचा हुकुमबी चुकला नाय. नशीब ! कोण बदलायचं याला ? या साली मक्याची कणसं मायंदाळी लागली. वैनी बाळातीण. तात्याला तिच्यामुळं कुठं जाता येत नव्हतं. एक दिशी त्येनं मला सातारच्या मंडईला धाडलं. कणसाची इक्री चांगली झाली. ऊन डोक्स्यावर आलं हुतं. गाडीभर कणसातली पाटीभर कणसं उरली हुती. पांढ-या पातळातली एक बाई म्होरं येऊन उभी व्हायली. कणसाच्या दराची चौकशी नाय, काइ नाय, नुसती उभी. मी वर पायलं. चंदा हुतो. मी वळखलं. ती हासली. मला आपसूक हासू आलं. काळात फूल उमालल्यावाणी हुशारी वाटली. ओळख विसरला नाही म्हणायंच.' वळख कशी इसरंल ?" 6 " ‘ खोलीवर येता ? ‘ माझी कणसं ? ' .. चला की जवळच आहे.' दुबळा । ६५