पान:रानवारा.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दारूचा कप लाबीत बोलला, 'तात्या, सावध बरं का. पोराला रामाचं नाव लावलंय तिनं उद्या शेता-घराची वाटणी मागाय हिथं आली तर तुझ्यावर बोंब मारायची पाळी येणार. ' ( ह्ये बरीक खरं बरं कां, तात्याराव तजवीज आधीच करा. ' कसली तजवीज करावी म्हणता ?" आवं, तगाईचं रेकार्ड करून रामाच्या वाटणीचं सारं तुमच्या नावावर घ्याकी करून. त्येला एवढा लहानाचा मोठा केला, त्येचं लगीन केलं, त्यो तुमाला 'नाय कसा म्हणील ? रांडंच्या पोराचा बा बनून भावाची पोरं वनवासी करतो काय भडवा ?' ( इतका येळ लोड पडल्याला तात्या तानात येऊन बोलाय लागला, रामा, मला कोणत्याच गोस्टीत 'नाय ' म्हणणार नाय. त्यो एकवचनी हाय. एकपत्नी हाय. रामापर्मानं त्यो मला देणार. रामानं बिभीषणाला लंका दिली. लंका मिळणार, आयोध्याबी मिळणार.' ‘मजी रामा परत लगीन करणार नाय व्हय ?" 'त्यो ढिगभर लग्नं करील. त्येच्यासंग लगीन लावाया आधी पोटुशी तर व्हायलं पायजे ना ? बीजवराला आता कोण देणार ?' ( आयला, तुकान्ना तू बोल्लास मातूर झॅक हां - रामा आता बीजवर झाला खरा पण मला वाटतं त्यो कोराच आसंल नाय का ?' कुणास ठावं.' 'त्येला उठवून इचाख्या का ?" 'त्येला नग. तिलाच इचारू.' ( " ती साताऱ्यात दोन रुपायावर धंदा करती. ती नाय सांगणार.' मग तु जा, मीच इचारीन. ती पैसं दिल.' 'ती नाय, मी पैसं देणार. ती इचारील. तू सांग.' ' तसं नग. ती पैसं दिइल. मी सांगीन. तू इचार. ' असा बीन बुडाचा कालवा रातभर चालला हुता. सकाळी पाणी भरायला उठलो तर सान्या पडवीत त्ये दारूडं आडवं तिडवं पडलं हुतं. मधीच कुणी वकून राडा केला हुता. आशाच एका राती तात्यानं माणसं जमवून माझ्याकडून लिवून दुबळा । ६४