पान:रानवारा.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• मी कशाला चितारू तुमचं आयुष्य ? माझं मी चितारलं तेच निस्तरतेय. मी तुम्हाला त्रास द्यायला थांबणार नाही पण तुम्ही माझ्या- साठी एक कराल ?' • काय करू ? मी, कोण बालीस्टर हाय ?" 6 नाही, म्हणूनच तर विनंती करतेय. तुमच्यासारख्या अश्राप माणसाचं नाव माझ्या बाळाचा बाप म्हणून द्या. त्याचं सर्व आयुष्य जाणाराय हो. त्या निष्पाप जीवासाठी माझ्या बाळासाठी, एवढी भीक मला घाला. मी जन्माची ऋणी राहीन. तुमचं नाव बाळाचे वडिल म्हणून लावू ? सांगा ना ?' 6 आजपातूर माझ्या नावावर मला बक्कळ शिव्या मिळाल्या. तुझ्या पोराचं त्यात्न हित होत आसलं तर लाव माझं नाव. पर पुन्हा या गावाला फिरक नगस. .. काय एखाद्याच्या नशीबाची गाठ देव सर्गात बसून देतो की आऋितच. ह्ये तिथनं बगायला त्याला मज्जा वाटत .. आसी घालून आसंल नाय ?' मी आसं बोललो खरा, पण ती गुमान संपाकास लागली हुती. पुन्हा काय बोलली नाय. मला वाटलं तसं मी बोललो, पण तिला माझं बोलणं रूचलं नसावं. त्या राती दोघांच्याबी झोपा लागल्या नव्हत्या. रातभर चुळबुळ चालली व्हती. मला सारखा खोकला येत हुता. ती म्हणाली, 'सरकारी हॉस्पिटलमधून उद्या औषध घेऊन या.' ' 'उद्या तू जाणार. ' जावंच लागणार. कोणाच्या बळावर रहायचं इथं ?' 6 मी पुन्हा बोललो नाय. वाटलं हिनं माझ्या दुबळ्यापणावर टोमणा मारला. राग नाय आला मला, पण बोलण्याचा हुरूप गेला. डोक्स्यावरनं वाकाळ घेऊन पडून राहिलो. झुंजूमुंजूला उठून तिनं सैपाक केला. मला वाटलं, आज ती नाय जाणार; पण तिनं बॅग भरल्याली बघितली मी निकाळजात कालवाकालव झाली. मी तिच्याम्होरं जाऊन मंतीर टाकल्यावाणी उभा व्हायलो ती झदिशी माझ्या पाया पडली. दुबळा । ६१