पान:रानवारा.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणली, 'तुमची कुवत मी जाणतेय. तुम्ही खंबीर असता तर मी दासी बनून तुमच्याजवळ राहिले असते. इतके देवगुण तुमच्याजवळ आहेत.' " देव रोजगारानं कामावर जात नसतो. दारूड्या भावाच्या लाथा खात नसतो आनी दुसन्याच्या पोराला आपलं नाव....' म्हणूनच तुम्ही देवापेक्षाही देव आहात. तुमचा मोठेपणा मी पाहिलाय. मोठेपण रूपात नसतं, शिक्षणात नसतं. ते असतं माणसाच्या हृदयात. तुमचं हृदय माणसाचं आहे. कधी भेट झाली तर ओळख द्या. जाते मी. जीवाला जपा. वाईट वाटून घेऊ नका.' आसं म्हणून ती उठली. वाऱ्याच्या झोतावाणी माझ्या म्होरनं निघून गेली. मी चौकटीला टेकून उभा न्हायलो. कोपन्यावर वळताना तिनं माझ्याकडं पायलं. मला उगीचच वाटलं, माझ्यावाणी तिच्याबी डोळयात पाणी आसंल. त्या दिसी तात्या-पोरं संमदी जेवली. मला मातूर घास गिळवला नाय. कश्यात मन लागलं नाय. तात्यानंबी मला गाडीभर शिव्या दिल्या; पण माझ्या गावी काइच न्हवतं. दिवस घरात बसून काढला. सांजंचा सैपाक शेजारच्या नानीनं करून दिला. तात्यानं दुसऱ्या दिसी संमदी पोरं आजुळाला घाडली. मला म्हणला, ‘रामा, तुझी बाईल गेली न्हवं ?" व्य.' ... लग्ना- व्हय काय म्हतूस भडव्या? ती तुझी बाईल हुती का ? आधीची पोटुशी नि म्हण-बाईल. बरं झालं टळली, आता तिला परत पाय घालू देणार नाय घरात. तुझ्या लग्नाच्या पायात मी कर्जबाजारी झालो, तुझ्या वरातीला, भावकीच्या जेवणावळीला, आनी धडताला माझा मायंदाळा पैका गेला. तुला आजपतूर बोललो नाय. पर रावताळ्याची मी मोठ्या रकमंची उचल घेतलीया. तू उद्यापास्तं त्येच्या वस्तीवर मळ्यात कामाला जा, तुला ऐकू आलंय नव्हं ? व्हय.' ( ऐकून मानंवर शिवाळ ठिवल्यावाणी जड वाटलं, पण तात्या मला बसून भाकरी घालणार नव्हता. जगू देणार नव्हता. ' नाय ' म्हणलं तर आसूडानं फोडील-मारील गुरावाणी. त्येचा मूळ सोभावच कसाबावाणी हाय. दुबळा । ६२