पान:रानवारा.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहेत. हस्तलिखित वाचणे हे एक प्रकारचे प्रयास. त्यातून माझ्यासारख्या नवोदिताचे हस्तलिखित वाचणे म्हणजे शिक्षाच; पण ती त्यांनी माझ्या- वरील मायेपोटी स्वीकारली, एवढेच नव्हे तर मला प्रेरणा व सहकार्य दिले. केवळ प्रेरणे अभावी काहींची कार्ये राहून जातात. पण मी या बाबतीत भाग्यवान ठरलेय. माझे मलाच वाटू लागते, की देणाराचे हात हजारो आहेत पण माझी दुबळी झोळी टिकेल का ? ही साशंकताही ते टिकू देत नाहीत. तरीही मला माझ्या या स्फूर्तिचैतन्याचे नम्रपणे मान्य करायलाच हवेत. या पुस्तकाचे मुखपृष्ठावरील वेधक चित्र रेखाटणारे मा. गुरूवर्य के. डी. कुंभार, तसेच जयश्री प्रेसचा कामगारवर्ग यांचे सहकार्य या पुस्तकास लाभले, त्याबद्दल मी त्यांची ॠणी आहे. मी 6 एक संसारी स्त्री म्हणून माझ्यावर काही जबाबदाऱ्या आहेत. त्या पार पाडताना स्वाभाविकच माझ्या संसाराव्यतिरिक्त धडपडीस मर्यादा पडतात. तरीही माझे पती श्री. आबासाहेब महाडीक यांनी मला माझ्या लिखाणापासून पुस्तकाच्या पूर्णत्वापर्यंत मनःपूर्वकतेने प्रेरणेपासून श्रमापर्यंत सर्वप्रकारे सहकार्य दिले. हे भाग्याचे सांगातीपण आयुष्यभराचे म्हणून विशेष उल्लेखनीय. , हे पुस्तक वर उल्लेखिलेल्या सर्वांच्या सहकार्याने आकाराला आले; जसे मोठ्या कुटुंबातील एखादे कार्य त्या कुटुंबियांच्या सहकार्याने पूर्णत्वास येते, की जेथे आभार- उपकाराचे पापुद्रे नसतात. त्या ॠणाला साक्षी ठेवून मी माझ्या हितचिंतकांना विनम्र अभिवादन करते. सौ. नलिनी महाडीक