पान:रानवारा.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऋणनिर्देश पुस्तक रूपाने जेव्हा एखादी साहित्य कलाकृती आकाराला येते तेव्हा तिचे श्रेय लेखकाशिवाय त्याला ज्यांनी प्रेरणा दिली, सहकार्य दिले व आशीर्वाद दिले त्या स्नेहांकितांना, आप्तेष्टांना व हितचिंतकांना असते. आभार मानणं हा तसा तुटक व्यवहार. जन्मतःच माता-पित्याचं ॠण घेऊन येणारं बालक दिसामासी वाढत जातं ते अनेकांचं अनेक प्रकारचं ऋण घेऊन. हे ऋण फिटणारे नसतात. तद्वतच कमी-अधिक आयुष्याचा वसा घेऊन आकाराला आलेली कोणतीही चांगली कृतीं असंच ऋण भाळी घेऊन आलेली असते. माझं हे पुस्तक आकाराला आलं ते असाच ऋणभार घेऊन. माझ्या हस्तलिखिताच्या वाचकांनी मला दिलेल्या प्रेरणेमुळं. प्रेरणा हे एक भाग्यचं व ही प्रेरणा मला देणाऱ्यात माझे आप्तेष्ट, हितचिंतक व स्नेहांकित मंडळी आहेत. प्रेरणा आणि सहकार्य म्हणजे आशीर्वादाचं सत्यस्वरूपच ! मला अभिमानानं सांगावी अशी बाब म्हणजे या कथासंग्रहाच्या प्रसिद्धीपूर्वी माझ्या गुरूवर्यांच्या मार्गदर्शनामुळे एम्. ए. (मराठी) परीक्षेत मी शिवाजी विद्यापिठात प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन, माधव ज्युलीयन आणि उमागिरीश या पारितोषिकाचा मान मिळाला. या कथासंग्रहाला सहकार्य देण्यातही माझ्या गुरूवर्यांचा हातभार मोलाचा आहे. त्यामध्ये आदरणीय गुरूवर्य प्रा. शं. ना. पाटील यांनी आपले सहकार्य पित्याच्या मायेने मला दिले. गुरूवर्य प्रा. बापूसाहेब कुंभोजकर, डॉ. सुमन पाटील, प्राचार्य अरविंद साळुंखे आणि प्रा. आ. ह. साळुंखे यांच्या चोखंदळ साहित्यिक मार्गदर्शनामुळे माझ्या लिखाणाचा विशिष्ट दिशेने प्रवास सुरू झाला. लावलेल्या रोपटयास फूल केव्हा येतेय ही जशी बालसुलभ उतावीळ उत्सुकता असते, तशी उत्सुकता या माझ्या आदरणीय गुरुवर्यांना माझ्या या पुस्तकाविषयी लागून राहिलेली होती. अशा पवित्र प्रेमळ ॠणात राहण्यात, नव्हे, ते वाढवून घेण्यातही मला आनंदच वाटेल. ज्यांचा मी हितचिंतक मंडळी व आप्तेष्ट म्हणून उल्लेख केला हा परिवार खपच मोठा आहे. ते सर्वजण माझ्या हस्तलिखिताचे वाचक