पान:रानवारा.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनोगत रसिक बंधु-भगिनींनो, रानवारा हा कथासंग्रह पुस्तकरूपानं आकाराला येईपर्यंतच्या साया घटना आज माझ्या नजरेपुढं उभ्या आहेत आणि आता हे पुस्तक आपल्या हाती देऊन मी त्याचं भविष्य आपल्यावर सोपवत आहे. ज्या ग्रामीण भागात मी वाढले-वावरले, तिथल्या जाणिवांनी, संस्कारांनी माझं छोटसं विचार-विश्व पोसलं गेलं. रानमातीचा रांगडा रंग असलेल्या भाषेत पात्रंही रांगडी-राकट आणि प्रसंगही. ज्या मानवी जीवनाला कसलीही चकाकी नाही, अनुकरण नाही, अशा स्वाभाविक जीवनाचं प्रामाणिक चित्रण करण्याचा हा प्रयत्न आहे. या ग्रामीण लोकांची श्रद्धा सांभाळून जगण्याची व प्रसंगी उधळून लावण्याचीही मनस्वी धडपड मला भावलेली आहे. पूर्वीसारखी आता खेड्यात चंद्रमौळी घरकुल राहिली नाहींत, पण या खेडुतांची आयुष्यं मात्र आजही चंद्रमौळीच दिसतात. एकमेकांच्या आयुष्याचं पाढं एकमेकांना पाठ न करताच पाठ असतात. अशाच ग्रामीण जगात मीही ' कुणी एक ' म्हणून वावरले जे अनुभूतीला आलं ते शब्दात आकारू लागलं. हे साहित्यात पडणारं माझं पहिलं पाऊलं ! 1 लेखक त्याचं लेखन पूर्ण करीपर्यंत ते त्याच्या आनंदासाठी असलं तरी त्याची पुस्तकरूपी कलाकृती रसिकांसाठीच असते. श्रोत्यांशिवाय वक्ता नाही. तद्वतच रसिक वाचकांशिवाय लेखकही मानला जात नाही. मला तुमच्या रसिकतेची दाद अपेक्षित आहे. रसिकहो ! हे माझ्या हातचं पहिलं रानफूल. माझ्या रांगड्या मराठी भाषेतलं. कदाचित पूर्ण फुललं नसेल, कदाचित सुगंध पुरेसा भरला नसेल, पाकळ्याही कदाचित वेड्यावाकड्या उमलल्या असतील; पण हे पहिलंवहिलं म्हणून त्यातील रंजकताही पहिलो-वहिली समजून अनुभवावी. गेली वहायाची रानफुले ओंजळीत ओला गंध उधळीत ओला गंध उधळीत ! - ती आता आपण स्वीकारावीत, मराठी मातीच्या आपलेपणानं ! सौ. नलिनी महाडीक