पान:रानवारा.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

' आरं सुंबाड्या तुझा - तुझ्या बायलंचा ! आसं त्वांड आ वासून माझ्या तोंडाकडं का बघतूस, हुबलाका ? बाइल आणली म्हणलं की पोरं हुयावीच. पैल्यावाणी आता नाय. घोडनवऱ्या आणल्या की वर्साच्या आतच पाळणा हालतुया. त्यात तुझ्यासारख्या येडया इदयाला आसी हाळदीच्या गाभ्यावाणी बाइल मिळाल्यावर आसं व्हणारच की, अं ? ... .. तुझा तात्या वाहत्या गंगंत न्हाऊन निघाला बग. तात्याचं डोक्सं मातूर हाय. मानलं आपुन.' हाणमा न्हावी माझ्या पुढ्यात्न कधी गेला तेबी मला कळलं नाय. जे काय बोलला त्यातलं झुंझुरकात दिसावं तसं थोडं थोडं घेनात आलं हुतं. माझी बाइल गरवार हाय, एवढं सांगाय त्यानं किती आडपडद्यानं, खुबीनं बोलण्याचं ढंग केलं. त्यात त्यानं आणिक बरंच कायतरी सुचवून ठिवलं. माझ्या टकुऱ्यात तर वायटूळ उठलं. हुदर्भात आगीचा डोंब झाला हुता. चंदानं माझा हात तिच्या अंगाला लावूबी दिला नव्हता नि पाळणा हालणार ! आसं इपरीत कसं ? नशीबच माझं इपरीत. या समद्या गोष्टीचा खुलासा झाला पायजे. चंदाला इचाराय पायजे. खरं-खोटं काय हाय त्ये कळलं पायजे. तात्यानं ह्ये काय करून ठिवलंय ? माझ्या जल्माचं मला कोडं सुटत न्हवतं. इचाराच्या चक्रीतच घराला भिडलो. जडशीळ पावलानं घरात शिरलो. तंवर इजवाणी कानावर बोलणं आलं, माझा हात सोड.' का ? सती सावित्री हैस जणु. आधी उजवून आलीस माझ्या भावाच्या आड लपवायला आन् माझ्याम्होरं फडी काढतीस व्हय ? ' हे सारं तुम्हापासून लपवलं नव्हतं. त्यासाठी माझ्या वडिलांनी पैसा ओतलाय. असे वागायला तू मला वकत घेतली नाही पाप्या 'एss आवदसे ! मला पापी म्हणतीस नि तू कोण ग सटवे ? नाय हात सोडणार बऱ्या बोलानं.. 'तात्याss' आसं म्हणत मी त्या दोघांच्या मधी जाऊन पडलो. पण चंदाचं दोनी हात धरून तात्या बिनयसनीच्या खोंडावाणी नाक फेदारून दुबळा । ५९ c