पान:रानवारा.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मी म्हणलं, ' दिवा इझला का काय ?' काळ्याकुट्ट आंधारात काइच दिसत न्हवतं. चाचपून दिवा लावला दार सताड उघडं हुतं. तात्याला हाका मारल्या, पण त्यो जागा झाला नाय. मग गुमान दाराला कडी घातली. नि तिला बजावून ठिवलं. नुस्तं दार लोटून झोपायचं नाय.' ती पडल्या आवाजात बोलली, 'तुमचे तात्याच होते. मी ओळखलंय.' तिच्या शब्दानं माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. मी ह्याचा जाब कुणाला इचारणार नव्हतो. तात्यापुढं मी - नागापुढं बेडकीची दशा ! जीभ टाळयाला चिकटल्यावाणी मी गप्प पडून न्हायलो. तिची झॉप लागली, पण मी आढयाचं वासं मोजीत राहिलो. कोंबडयानं बाग दिली. मी चंदाला जागं केलं. सारं सांगितलं. रोज आसं लौकर उठून सान्यांचा संपाकपाणी धुणं-भांडी करावी लागत्याल, म्हणालो. तिनं ऐकून घेतलं. कामाला लागली. मी उठून रांजणभर पाणी भरलं आन् गवातकाडीसाठी मळयाकडं गेलो. पण जीव सुचित नव्हता. सांन्या जल्याचा धसका बसला हुता. मी कुणाला काइच सांगू शकत न्हवतो. लग्नाला दोन-आडीच महिनं झालं. चंदाचा नि माझा जेवढ्यास तेवढा संबंध. कामापुरतं बोलणं. तिच्या मनाइरूद मी वागणार नव्हतो. ती घरातलं संमदं येवस्थित बघायची. त्यात मला बक्कळ समाधान वाटत हुतं. तात्या त्याचा पाच सहा पोरं अनि आमी दोन वेळा सुखानं दोन घास खात हुतो. एक दिवस सूर्य झलल्यावर लगूलग घराकडं निघालो. डोक्यावर गवताचा भारा हुता. साळयाच्या हियीरीवर हागमा न्हावी मला बघून वाटंबरच आडवा उभा राहून बोलला, ' काम रामा, बायलंसाठी बिगीनं घरी येतुस आताशा.' तसं नायबा.' मग कसं? ● " आज रोजगारावर गेलो नव्हतो.' 'आरं रामा तुझा भाऊ रोजगार करीना नि तुझी कार्टी-पुर्टी उपासी-मरत्याती व्हयं रं? एवढं कामामागं कसा हात धुवून लागतूस ? हांऽऽ, एवढंबरीक खरं हाय, पयला पाळणा लवकर हालणारं आसं दिसतंय.' कुणाच्या पाळणा ?' दुबळा । ५८