पान:रानवारा.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गाजत गावात येणं झालं. वरात लई थाटात काढली. 'भावकीचा रूसवा काढीन' म्हणून तात्यानं शब्द दिला हुता. भाऊबंद खूष झालं. राती तीन वाजता नवरी माप वलंडून घरात आणली. बायकानी नाव घ्याला आग्रेव धरला. हो-नाय म्हणता शेवटाला तिनं माझं नाव घेतलं. 'रामचंद्र' एवढंच त्यातलं आठावत मागं पुढं काय संगीत हुतंत्ये लक्षात नाय; पण मला जन्माचं सार्थक झाल्या- सारखं वाटलं. कागदपत्रालाबी माझं नाव 'रामा' आसंच हाय. मला कुणी 'रामचंद्र' म्हणलं न्हवतं. माझ्या बारश्याला 'रामा' आसंच नाव ठेवलं हुतं की काय कुणास ठावं. पण म्हणूनच माझं नाव 'रामचंद्र' घेतल्यानं मला आप्रूवाई वाटली. मलाबी नाव घ्यायला सांगितलं मीबी नाव घेतलं 'भाजीत भाजी मेथीची चंद्रसेना ' माझी पीर्तीची.' तिथं जमल्याली संमदी हासली. म्हणलं, 'हासा, आता मी लाजणार नाय.' हुर्द्यात मावत नव्हता आसा हुरूप आला होता. 3 पोरं यदुळाच झोपली हुती. त्याच्या शेजारीच सोप्यात तात्यानं आपली वाकाळ टाकली. घगत नवी गादी टाकली हुती. तात्यानं मला सांगितलं, 'आत झोप तू.' मी आत गेलो. चंदा गादीवर पडून आड्याकडं वधूत हुती. मीबी वाईच उभा राहून बघत राहिलो तिच्याकडं, पण तिनं माझ्याकडं बघितलं नाय. मुद्दामच चाललंय असं वाटलं. काय बोलावं त्ये मलाबी सुचत नव्हतं. मला भ्या वाटतं हुतं. आपल्यासारख्या खुज्यासंगं लगीन लावलं आसलं, तरी ती आपल्यावर राजी नाय. आपुण कुणावर बळजोरी करून फुकट तमाशा करू नाय, आसं मनाला दटावलं. जरा धटपणानंच गादीच्या कोन्यावर बसलो. ती पडचाल सरकली. काय बोलली नाय. बघितलंबी नाय तिनं माझ्याकडं. मन कसनुसं हासलं-माझ्या नशीबाला. दिवसभराचा हुरूप करपून गेला; पण आशा संपली नव्हती गादीवर मोकळंपणानं पाय पसरून झोपलो. तिनं आंग चोरून आंगाचं मुटकुळं केलं आन् माझ्याकडं पाह्यलं. मी हासलो. तिचा हात हातात घेतला. तिनं लागलाच सोडवून घेतला. मग मी भिताडाकडं त्वांड करून पडून हायलो. आसा किती येळ गेला कुणास ठावं. माझी झॉप लागली. तिच्याच घाबन्या घुबऱ्या आवाजानं जागा झालो. आहो, इथं कोणीतरी आलं होतं.' ( दुबळा : ५७