पान:रानवारा.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" " लेका हुबलाका ! कुणाचं ? आसं नाय इचारायचंस ? आसं आसं ! तुझंच लगीन ठरवुन आलो. माझं राहिलं तुझं तर तुझं कोरा हायस म्हणून तुला लेक द्याला एकजण कबूल झाला तू तोंडाकडं काय बघतूस ? पोरगी नव्वी फास हाय. देखणी हाय दैव लेका तुझं.' " मला ह्ये सारं खरं वाटत न्हवतं. गवताचा भारा घेऊन बैलापुढं टाकला. तिथंच बाजंवर आंग टाकलं. तात्याचं भाषाण टकुयात भिरभिरत हुतं- पाकुळीवाणी. पोरगी नव्वी फास- देखणी- दैव लेका तुझं.' खरंच सारं गाव मला 'खुजा रामा ' म्हणतंय. रंगानं काळा उच्चीला खुजा, हातपाय थिटं - आल्या गेल्याची करमणूक-अशी अंगकाठी. हीच शाळंलाबी नडली. शाळंत सारी पोरं चिडवायची. मास्तर मिशीतल्या मिशीत हासायचा. मला घंटा वाजवायला, पाणी आणयला सांगायचा, कधी कधी म्हशीचं शेण घरी सारवायला पायजे नेऊन दे. जा.' आसा मलाच हुकुम सोडायचा. वर्गातलो संमदी पोरं निराळी नि मी निराळा. मला त्ये सारं नक्को वाटायचं. कसंतरी चौथीपतूर कटलं, त्या साली आई देवाघरी गेली. बा त्याआधीच गेला हुता मग शाळा सोडली. तात्याचा 'व्हय वा ' झालो. मनाची समजूत घातली, 'त्यो आपला पालनकर्ता हाय.' भाऊ हाय. जगाची मुस्काटात खाण्यापरीस ह्याच्या लाता खाल्ल्या तरी परवडत्याल.' तिथून सारं आसच चालत आलं. कधी काळी आपलं लगीन हुईल आसं सपनातबी वाटलं न्हवतं. आन् आज तात्या माझं लगीन ठरवून आला हुता. खुषीत बोलत हुता. रोज राती पिऊन आल्यावर मला इनाकारणी लाता घालणारा तात्या माझ्यासंगट गॉड बोलत हुता. पोरीच्या बाबरोबर त्याची देण्याघेण्याची बोलणी झाली हुती; पण मला त्ये काइ खरं वाटत न्हवतं. नव्वी फास झाल्याली, देखणी पोरगी देणारा बाप माझ्यासारख्या खुज्या, चौथी शिकलेल्याला हुंडा कसा देईल ? तात्या म्हणतो, 'तू कोरा हायस मातूर खरं हाय. पण तेवढ्यासाठी कोण पैसा मोजील ? ह्ये खर ते नसणार. . काय जादू झाली कुणास ठावं; पण लगीन ठरल्यापास्न त त्या लई मऊ बोलायला लागला. माझी खाण्याजेवणाची चौकशी करू लागला. दुबळा । ५५