पान:रानवारा.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दुबळा वैनी सरावणाच्या महिन्यात पाच-सा पोरं माग ठिऊन देवा घरी गेली. आन दादाचं टकुरंच फिरलं. त्याचा तसा जीव नव्हता वैनीवर; पण सारी परपंचाची जबाबदारी अंगावर पडली. त्यात त्याला बाटलीचा नाद. त्यो कुठला सुटायला! त्याला सार आवघड लागलं. कुणी गरीबनाचार कुळवाडीबी त्याला आपली लेक देऊ धजंना. त्याच्या जीवाची नुसती उलघाल हुयाची. सारा राग पोरांच्यावर नि माझ्यावर निघायचा. तरी बरं, जाताना दोन पोरं येशा नि पारी तेवढी इथं ठिऊन बाकीची चार रापी-टुपी पोरं त्याच्या मावळ्यानं भनीच्या दिमाला आला त्याच टायमाला आपल्यासंग आजुळाला नेली हुती. तात्याचं दुसरं लगीन झाल्यावर पोर आणायची हुती; पण तात्याचं लगीन जमत नव्हतं. तात्या आपणहून सोताच्या लग्नाचा मुद्दा काढायचा आन् ऐकणारा औशीद घेतल्यावाणी काढता पाय घ्याचा. आसं काही महिनं गेलं. एक दिवस तात्या खुषीत येऊन मला बोलला, ‘रामा, लगीन ठरलं! ' ठरलं ? कुठलं जमलं ?" A