पान:रानवारा.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आता माझं तिथं उभं रहाण्याचं आवसान संपलं होतं. भांडं ऊतू जाऊन त्यातील रटरट थांबावी, चूल विलून, धुरानं डोळं भरावंत, असंच काहीतरी झाल्यासारखं वाटलं, झपाट्यानं घराकडं निघाले. घरी पोहल्यावरसुद्धा मनातला आक्रोश थांबला नव्हता. मन सुन्न झालं होतं. त्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत झोप लागली नाही. बाहेर बायकाही बोलत होत्या. खूप उशीरा झोप लागली. पहाटे रोजच्यासारखी जाग आली; पण ती पहाट रोजच्यासारखी उमलत नव्हती. शेजा-या-पाजा-यांची मुका-मुकाट्यानं नेहमींची कामं चालली होती. सारीजण अपराध्यासारखी आपापल्या घरात वावरत असावीत, असं वाटत होतं. रोजच्यासारखी शेजाऱ्यांच्या बोलाफुलांनी आज सकाळ शृंगारली नाही, तिच्या मनाच्या खोल गुहेत कालच्या कातरवेळचा आक्रोश अजूनही ऐकू येत असेल; म्हणूनच पहाटही मुक्यानंच आपल्या डोळ्यातील दहिवर सांडून गेली होती.. Coo.