पान:रानवारा.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्वभावाला चैनच पडलं नसावं. घराकडं येणारा प्रत्येकजण काळजीनं विचारपूस करीत होता. दिवेलागणीच्या वेळी टॅक्सीचा आवाज झाला. ' टॅक्सी भरारली बगा. आली वाटतं मनू' टॅक्सीच्या आवाजाबरोबरच शांतावैनीचं बोलणं कानावर पडलं. मी भाकरी करत होते. तसाच हात धुतला. चुलीतली लाकडं मागं ओढली. त्यावर जाळ विझविण्यापुरतं पाणी टाकलं. हात पदराला पुसतच बाहेर आले. मी रस्त्यावर आले, तेव्हा ती कातरवेळ उरी फाटली होती. आक्रोशानं सारं वातावरण विछिन्न झालं होतं. येथून गेलेल्या स्थितीतच मनूला परत आणलं होतं. शिवाय तिचं प्राणपाखरू उडून गेलं होतं. मनाचा दगड करून मी मनूला पहायला गेले. तिची दोन मुलं रडून रडून व्याकुळ झाली होती. शेजारच्या आया-बाया त्यांच्या तोंडावरून हात फिरवीत होत्या. पोटाशी धरत होत्या आणि त्याबरोबरच त्यांचेही हुंदके वाढत होते. बायकांची गर्दी पडवीत मावत नव्हती. कोणी मनूचा स्वभाव आठवून डोळयाला पदर लावत होतं. कोणाचा तिला किती त्रास झाला हे सांगताना कंठ दाटून येत होता. पलिकडं ओसरीवर मनूचा नवरा गुडग्यात मान घालून बसून होता. दोघं उभं राहून पुढच्या सोपस्काराचं एकमेकात हळुहळू बोलत " हातावर तंबाखू मळत होते. गर्दीतून थोडं आणखी पुढं सरकल्यावर मला मनूंचा देह दिसला. भिंतीला टेकवून तिला बसवलं होतं. मळवट भरला होता. दोन दिवस झालेल्या हालअपेष्टात विस्कटलेले, रखरखीत कोरडे झालेले केस कसेतरी मागे सारून डोक्यावरून नीट पदर घातला होता. नेहमीपेक्षा तो फारच पुढे आला होता. त्यामुळेच की काय पण मनूची निर्जीवता लगेच लक्षात यंत होती. मिटल्या डोळ्यांची मनू बसल्या जागी जणू शांत झोपली होती. ते सारं भयानक आणि करुण दिसत होतं. तिची मुलं, आई 55 ए आई ग... बोल कीऽऽ' असं म्हणून टाहो फोडत होती. आणि ऐकणान्यांच्या डोळ्यांचे झरे झाले होते. बायकांची कुजबुज आपसात आक्रोश | ५०