पान:रानवारा.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संसार करत्यात्या कुणाच्या कापल्या करंगळीवर मुतायच्या न्हायत्या, व्हैमाल्या! घरचं मराय लागलंssतरी दारचं सोडायच्या न्हायत्या. मायंदाळा हावरूस. लई हपाप. ती न्हवं गाढीव ! सून आडली तरी तिच्या संगती जायाचं झालं नाथ तिलाss. ' खरंच मनूची सासू गेली नाही बरोबर. जायला हवं होतं. ' आसं तू म्हणशील. मी म्हणन. तिला गतकाळीला तसं वाटायला नग काss ? ... म्या तिला टोकलं, टॅक्सी चालली तवाच. बिनआब्रूची म्हंतीया, " माझी टिक्की म्हस याला झालीयाss. तिला बगाय नग काss?.... .... ass ! तिच्या जिनगानीवर. बाई लई उफराट्या काळजाची हाय ग. समद्या गावाला आक्रीत दावाय बसलीया 6 दुसरं कोणीतरी बाईमाणूस दिसलं टॅक्सीत...' 'ती धूपंदा हुती. तिचीच चलत जाव. शेताच्या भांडणात एकमेकी डाय पडल्यात्या ; पण येळपसँग जाणून उभी व्हायली का न्हाय तीच ? वैन्याला दया ईल आसा पर्संगच हुता. हिचं मातूर काळीज वांडरावाणी. फोडावणी, सूनंला टॅक्सीन घालून न्हिली की, लगूलग म्हशीला धुयाला नदीवर उलातली.' मनूचं काय होतंय देव जाणे. मुलाचं काही का होईना पण ती ' तीच हातीपायी निटनिटकी येऊ देरेss इठुबाराया ! मनू लई गुणाची पोर हाय बग. तिला पयली दोन पोर देवाच्या दयेनं चांगली हायती. लेक हाय, ल्योकबी हाय. करायचा काय आणकी पोरवडा ? . शत खाल्लं पाखरानं आन् आय खाल्ली लेकरांनं' अस्स हुयाला नग. जगली वाचली तर रग्गड झालं.' HOO ► " मनूच्या सासूला मनापासून शिव्या देणाऱ्या गंगाआजी मनूचं एक एक गुण आठवीत होत्या. तिच्या सुटकेच्या बातमीकडं गावातल्या सगळ्या आयाबायांचं लक्ष लागलं होतं. गवताचं भारं घेऊन येणाऱ्या बाया, भुई- मूगाचं वेल घेऊन येणाऱ्या बाया, ओझं टाकता-टाकता, ' मनूचं काय कळलं का टॅक्सी आली का ?' असं विचारत होत्या. दिवसभर रानातल्या कामात गुंतलेल्या हळव्या आक्रोश । ४९ --