पान:रानवारा.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चाललेली होतीच. बायकाच्या जातीला बायकाचीच जात वैरी आसती बगा. सोन्यासारखी बाई निम्म्या संसारात उठली का न्हाय ?' " व्हय बाय खरं हाय तुझं. कुठल्याबी कामात बायकाचं दुःख वाढवायला बाईच कारण हुती. बायकाच्या जातीनंच बाईचं दुःख जाणलं पायजे तर बाप्पे ध्यान देत्याती. t अग् यंऽऽसुले, त्वांड मिटीव, आली की ती, मनूची सासू.' बोलणा-या, कुजबुजणाऱ्या बाया गप झाल्या. पोरं रडतच होती. त्यांना समजूत घालणान्यापण त्यांच्याबरोबर आक्रोश करत होत्या. जोतं चढून येणाऱ्या वंचळावकाच्या हातातील दुधाची कासंडी एका बाईनं चलाखीन काढून घेतली, आणि एकच आकांत सुरू झाला. मनूचं एक-एक गुण सांगून तिची सासू धाय मोकलून रडू लागली. रडता रडताच तिच्या माहेरी कळवलं पाहिजे म्हणून सांगत होती. लागलीच एक दोघं तिकडे गेले. आंगणात बांबू बांधले जात होते, अहेव लेणी घेऊन बायका मुसमुसत उभ्या होत्या. हिरवं पातळ, ओटीचं सामान, हळद-कुंकू, असं एकेक जमा होत होतं. रडून रडून धाप लागलेल्या पोरांना कुरवाळीत मनूची सासू देवाला शिव्या- शाप देत होती. मघापासून रडणाऱ्या बायांचे अश्रू थांबले होते. मनूच्या सासूकडे पहाण्यात त्या कठपुसळचा झाल्या होत्या. माझासुद्धा माझ्या डोलचावर विश्वास बसत नव्हता. काय पहात होते मी ? गुरासारखं ओरडणाऱ्या आपल्या सूनेचा कालपर्यंतचा आक्रोश तिच्या सासूला ढोंग वाटत होता. गळ्यापर्यंत बाहेर आलेला, वाळून गेलेला मांसाचा गोळा ती मख्खपणे पाहू शकली होती. मुलाच्या विनवणीलाही ती द्रवली नव्हती, ती मनूची सासू आज घराचं छत फाटून जाईल असा आक्रोश करत होती. जगाला दाखविण्यासाठी तिचा हा आकोश होता, की खरोखर तिला पश्चाताप झाला होता ? ती मनूपुढं दुःखातिशयाने अंग टाकून गडवडा लोळत होती. दोघी- तिघी बाया तिला सावरत होत्या; पण तिला पदराचं भान नव्हतं, पाठीवर केस सुटले होते आणि ती दुःखानं बेभान झाली होती. एका बेसावधक्षणी आक्रोश ! ५१