पान:रानवारा.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वाटतीया.' [[]] ते ऐकून माझी छातीच दडपून गेली. पुढं काही बोलावं, विचारावं, असं वाटलंच नाही. कंबरेतून गळून गेल्यासारखं वाटलं. अंगाला बारीक कंप सुटला. घरात येऊन ढसा ढसा पाणी प्याले, धरणीवर अंग टाकलं नि सुन्न पडून राहिले. • मास्तरणेss ! अग, येss मास्तरणे, झॉप लागली का काय तुझी ? आss ?” गंगाआजींच्या हाकामागून हाका आल्या. मी दारात पोहचेपर्यंत त्यांनी बरंच बोलून घेतलं होतं. मला दारात बघून नेहमीसारखं ओसरीवर बसून त्यांनी कमरेची तपकिरीची डबी काढली. चिमटभर तपकिर नाकात कोंबली. माझ्याकडं टक लावून पहात, डबी पुढं करून म्हणाल्या, 'तूबी वढ. झोप जाईल. आक्रूस जाईल... " नको मला. मी नाही ओढीत.' व्हय ? 'अग, तू मास्तरीण. तू आमावाणी तपकिर कशी वढशील ? अं ? पण कोमॅजलीस म्हणून एकांदी बारीला वढलीस तर बाटशील 'नकोच पण. मी कधीच नाही ओढत.' assरं बाई, हायलं ' आणखी एक तपकिरीचा बार नाकात भरल्यावर गंगाआजींना थडाथड् शिंका आल्या, तेवढ्यात त्यांची नजर वाळत घातलेल्या बाजरीत कोंबड्या शिरल्या होत्या तिकडं गेली. " 'थू ss, तुमाला बोक्यानं उच्चली, एकीकीला. रोग आला तुमाला मालकीनीच्या कनगीची लिपणं फोडा की. पसाभर दाण कोंबड्याम्होरं फेकत न्हाय बाई. आन् ती दिसभर वाळवाण खात्याती माझं चैन पड़ दिईनाती मला अग् खुड एssखुडं. शुक शुक्र हां हां अग खडकीss.. ?' कोंबडया दूर हकलून पुन्हा गंगाआजी गुडग्यावर हात देऊन, दमून ओसवीवर बसत म्हणाल्या. त्या वंचळीची आन् ह्या कोंबड्यांच्या धन्नीची किस्नीची एक जात हाय बग. रात् न दिरा संसाराच्या मागं लागल्याल्या. नका-बोटानं आक्रोश । ४८