पान:रानवारा.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देवाला ठावं. मी गेले हुते तवा तिचा नवरा सोप्यात टकुरं धरून बसला हुता. सासू डोळं फिरवीत आत-बाहेर करीत हुती. मग मीबी नाय बोल्ले. जरासं मनूकडं बघितलं, बिनसुदीच हुती काय थांबून करायचं म्हनलं, आल्ये गेल्यापावली परत. ' आता मी तरी पहायला जाऊन काय निराळं पहाणार होते ? मला घरात थांबवून ठेवणारं मन स्वतः मनूकडं सतरा वेळा जात होतं. चरफडत होतं. अशाच एका व्याकुल क्षणात मनात विचार आले, 'आम्ही स्त्रिया एकमेकीसाठी काय करू शकतो ? एकमेकीची फाटकी आयुष्य फक्त पहात असतो. लक्तरणाऱ्या, मातीमोल होणाऱ्या, आया-बहिणींच्या आयुष्याला आम्ही फक्त साक्ष असतो आणि त्या आमच्या.. एव्हाना ऊन्हं अंगणात आली. मनूची आजची सायंकाळ कशी असेल ? दुपार कशी असेल ? असेल की नसेल ? मनाच्या झन्यातून उसळी मारून वर येणाऱ्या प्रश्नाने मीच शहारत होते. मनूबद्दल वाईट कल्पना करणाऱ्या मनास दोष देऊन, त्याच हळव्या मनास मी दिलासा देत होते. वेळ पुढे सरकत होती. अस्वस्थता वाढत होती. आज मनूच्या घराकडे जाणारी बायका-माणसांची वर्दळ वाढली. जिथं-तिथं तोच विषय कुजबुजला जात होता. भीतीचं सावट बोलणान्याच्या शब्दाशब्दावर दाट होत होतं आग-बाया आपल्या लहान-लहान पोरा- सहीत मनूला पहायला रीघ लावून होत्या. शेतावर उभं पिक वाट पहात असताना बाया घराघरात रेंगाळत होत्या. बाप्ये शिवारात निघताना जरा नरमाईनंच कारभारणीला शेताकडं लवकर येण्यास सांगून जात होते. घरात चैन पडेना म्हणून बाहेर रस्त्यावर येऊन उभी राहिले तेथून मनूचं घर दिसत होते. ते दृश्यच मन सुन्न करणारं, भीवविणारं होतं. जणू एखाद्याच्या शेवटच्या घटका भरत होत्या. पाहून येणाऱ्या दोघी-तिघी आपसात कुजबुजत आपापल्या घराकडं वळत होत्या. मनूचा नवरा टॅक्सी आणायालाच गेला आसंल बगा.' ' कुणास ठावं. काल दुपारपास्न माय-लेकराचं तू-मी चालं हुतं. मनूची सासू म्हणाली, 'माझी चौदा बाळातपणं झाली. पण कंदी डाक्तराचं खांड पायलं नाय. ही बाईच सोंगाडी, सान्या गावाला थेर आक्रोश । ४६