पान:रानवारा.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्ध्या- अर्ध्या तासाने दारात येऊन उभी रहात होते. माझा जीव जणू टांगणीला लागला होता. मी तीन मुलांना जन्म देणारी एक आई होते; पण मनूचं या वेळचं आई होणं निराळं होतं. यातनांचं होतं. ती अडली होती. कदाचित फारच भयानक यातनांना ती तोंड देत असेल. मी तिच्याकडे जाऊन तिच्या यातना कमी होणार नव्हत्या. फक्त तिच्या यातना मी पाहू शकणार होते; पण त्यातून मनाची आणखी तडफड. नकोच ते रात्री झोपेपर्यंत मी. 'मनूची सुटका झाली की नाही ?' या एकाच बातमीच्या मागावर होते; पण तिची सुटका झाली नव्हती. तिच्या यातना प्रहरांचा विचार करतच मी झोपी गेले. मध्यरात्री एका भीतीदायक स्वप्नातून दचकून जागी झाले. स्वप्नात मनूला एका मोठ्या अजगराने गिळले होते. तिचे डोके फक्त अजगराच्या तोंडाबाहेर होते. जीवाच्या आकांताने ती टाहो फोडत होती; पण कोणीच तिला वाचवू शकत नव्हतं. जागेपणीही स्वप्नातील तो प्रसंग डोळ्यापुढून हलेना. घशाला कोरड पडलेली, पण उठून पाणी पिण्याचे धैर्य होईना पुन्हा झोपही येईना. कुस बदलता-बदलता रात्र पुढं सरकत होती. अनेक विचाराचे रातकिडे मनाच्या काळोखात कर्कशपणे किरकिरत होते. पहाटेच्या सुमारास बायकांची कुजबुज कानी आली. दाराजवळ जाऊन कानोसा घेतला. मनूची सुटका अजूनही झाली नव्हती व ती मध्यरात्रीपासून बेशुद्ध होती, एवढंच कळलं. सकाळी शेजारणीकडं चौकशी केली. तिच्याकडून समजल की सुईणीनं काल दुपारीच ' आपल्या हाताबाहेरचं काम आहे. दवाखान्यात घेऊन जा.' असं सांगितलं होतं. रात्रीपर्यंत तिनेच प्रयत्न केला पण मनू बेशुद्ध झाल्यावर ती निघून गेली. त्या आधी मनूच्या नवऱ्याला - सासुला ती खूप बोलली. शेजारीण म्हणाली, " पैशावरून मायलेकराचं बिनासलंय बारमाही आसंच चालतं; पण येळकाळीची वळख ह्यास्नी डोळयानं बधावती कशी, त्येच कळंना झालंय बघा.' आता काय करणारायत ?' आक्रोश । ४५