पान:रानवारा.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहोत असं वाटणं, असलं तुम्ही अनुभवलंय ? प्रमाणात ?, .. .. अग तुझ्या शरीरात रक्तच कमी आहे. म्हणून होतंय असं. चेहरा फटफटीत पडलाय. ओठ पांढरे दिसतायत. रक्तवाढीवर काही औषध नाहीतर इंजिक्शन घ्यावं. काही तरी वेडा-वाकडा विचार का करतेस ? कुणाला न झालेला त्रास तुला होतोय असा कसा विचार करतेस ? असा त्रास सगळ्याजणींना या दिवसात कमी-अधिक प्रमाणात होतोच ग.' पण खरं तर तिचा 'तो' त्रास मला अगदीच अनोळखी होता. तिनं मला त्या तक्रारीवर उपाय विचारला. तेव्हाही मी न डगमगता डॉक्टरचा सल्ला व्यायला सांगितला. त्यावेळी मात्र तिच्या चेहऱ्यावरील उत्सुकता मावळली. हिरमुसल्या तोंडाने ती म्हणाली, ' " ते काय मला ठावं नाही होय ? इथं या गावात डॉक्टराच्या हाताखाली काम करणारा आठ-पंधरावडयाला एकदा येतो. त्याला डॉक्टर-डॉक्टर म्हणून औषध घ्यायचं. ते सर्दी-पडशाला बरं, अशा दुखण्याला कराड गाठावं लागत, बाई. ते आमच्या घरच्या राजवटीत नाही बसत. ' मी म्हटलं होतं, ' मनू, तुझी पहिली दोन बाळंतपणं झाली त्यावेळी असा त्रास तुला झाला होता ?" 4 .. थोड्या तरी बाई, पहिल्या दोन्हीही वेळेला एवढं पोट न्हवतं बघा. ह्यावेळेला पोट गाडीवाणी आलंय. वाटतं दोन हायती का तीन कुणालाला ठावं. मालकाची कमाई चिमणीचा चारा. कसं होणार काय होणार आसं वाटतं. हे पोटुशी रहाणं माझ्या जीवावर बेतणार.' 4 मनू, वेडी का तू ? अशा आवघडल्या दिवसात असं बोलू नये.' मी तिच्या बोलण्याने शहारले होते पण ती मनापासून बोलत होती. आपला दुखरा जीव हलका करीत होती. धुणे घंऊन ढेपाळल्यासारखी जाणारी पाठमोरी मनू मी परवाच पाहिली होती. आज ती मरणाच्या उंबरठ्यावर होती.' घराकडं मला काही सुचेनासं झालं होतं. मला तिच्या जाण्याचं धाडस होईना. कामात मन रमेना. हातचं काम मधेच सोडून मी आक्रोश । ४४