पान:रानवारा.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खडकावर मूक बसून राहिली. सभोवतीचं तिला भानच नसावं. दोन्ही डोळे हातानं झाकून ती थोडा वेळ तशीच बसली तिला भोवळ आली असावी, असा विचार करून मी हातातला कपडा ठेवून तिच्याजवळ गेले. मनू, काय झालं ग ?' तिनं मान वर करून पाहिलं. म्लान हसली. म्हणाली, ' थोडं अंधारल्यासारखं झालं. या खेपेला आसंच होतंय बघा, जीव काढून घेतल्यासारखं. शरीरात त्राणच राहीना.' L तिनं आपल्या तक्रारी सांगायला सुरूवात केली. तिची सासू तिला कशाप्रकारे त्रास देते, हे सुद्धा तिनं वैतागून सांगितलं. ती अशी कधी चिडलेली वैतागलेली मला आढळली नव्हती. हे सारं सांगताना तिचं हसरं डोळं भरून येत होतं. आपल्या गरोदरपणाच्या तक्रारींना सासू ढोंग " म्हणते हे तिच्या जिव्हारी लागलं होतं. नदीवर कोणी नाही असं पाहून तिनं बसल्या जागी पातळाच्या निया सोडून आपलं बेढव-सैलसर, पिकल्या फळासारखं, गरगरीत, मोठं पोट मला दाखवलं. तिला वाटत होतं आपल्या तक्रारी ऐकून, आपलं पोट पाहून ही 'मास्तरीण ' काही उपाय सुचवील. जणू मी डॉक्टरीन किंवा सुईण होते. पण मी काय सांगणार होते ? केवळ •सहानुभूती दाखावायची. धीर द्यायचा. डॉक्टरचा सल्ला घ्या, म्हणायचे. एवढंच. पण तिच्या नजरेत नितांत विश्वास आपलेपण बहिणीला विचारावं असं आपलं कोडं विचारायचं. डोळ्यात अशा विश्वासानं पहायचं की हृदयातच उडी घ्यायची. तिच्या त्या तक्रारी ऐकून ती स्थिती पाहून मीच हळवी झाले होते मी काहीच बोलत नाही, हे पाहून तिनं कातर स्वरात मला विचारलं होतं, • बाई, तुम्हाला असा त्रास होत होता का अशा दिवसात ?" तिच्या प्रश्नानं मनात थरकले. पण वरवर काहीच न दाखवता म्हटलं, " त्रास होतोच ग. मला का चुकला होता ? पण तुझ्या अशक्तपणा- मुळं तुला अधिक जाणवत असेल एवढंच.' पण हे असं सारखं धाप लागल्यासारखं होणं, दमल्यासारखं होणं, हातापायाला गोळं येणं, कधी कधी तर आपण अगदीच निर्जीव आक्रोश | ४३