पान:रानवारा.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डॉक्टर आणील व्हय ? नाव काढू नगस.' नको ? पण आता तर ती अडलीय म्हणता, मग डॉक्टर आणायला , नाहीतर तिला तरी दवाखान्यात न्यायला पाहिजे.' 1 ह्ये तुला वाटतंय. मला बी पटतंय. पण तिला आसलं समदं नवं थेर वाटतं. तिची तिच्या घरात सत्ता हाय. सत्तम्होरं शानपण चालत नाय, माझे बाय. ' " आता सुईण असंलच कोण ? ( हाय की. सान्या गावाची तीच की, बनू माळीन.' ' त्यांचं काय मत ?” " ती मस्त तरबेज हाय. पण सकाळीच तिनं रॉप सांगून टाकलंय की, 'बाईला हत्नं हालवा. मी भरोसा देत नाय. तुमावर समदी जोखीम हाय. या बातमीनं काळजात घर केलं. गंगाआजी बराच वेळ गप्पा मारत बसल्या. पूर्वी गावात कोण अडलं होतं, तिची सुटका कशी झाली. कोण काय म्हणलं, कोण नर्स कशी, कुठल्या दवाखान्यात कसा इलाज करतात, गरोदरपणात काय होतं, बाळंतपणात कोणती काळजी घ्यायची, वगैरे एक ना दोन अनेक गोष्टी चर्चेत आल्या. पण मनाला लागलेली रुखरुख कमी न होता जखमेसारखी ठसठसत राहिली. नांगऱ्याची मनू माझ्या चांगल्या परिचयाची होती. तिच्या घरी माझं जाणं-येणं कधी नसलं तरी कपडे धुवायला नदीवर गेले की, ती नेहमी भेटायची. कधी शेतावर जाताना दारातच थोडं थांबून बोलायची तिचं दहावीपर्यंत शिक्षण झालं होतं. ती बाळबोध वळणाची होती, तरी तिचे विचार मागसलेले नव्हते. मात्र तिच्या सासूपुढं तिच्या विचारांना थारा नव्हता. मनू परवाच तर मला नदीवर भेटली होती. गाड्याएवढं पोट वाढलं होतं, तरी बादलीभर कपडे घेऊन ती नदीवर आली होती. एरवी तिचा स्वभाव हसरा सदा बडबड करणारी. डोळयात पाणी येईपर्यंत मनस्वी हमणारी. भेटेल त्याच्या घरा-दाराची, मुला-बाळाची आपलंपणानं चौकशी करणारी. पण त्यादिवशी फारच कोमेजली होती. बादली खाली ठेवून ती आक्रोश | ४२