पान:रानवारा.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1 पिकलेल्या सुगीच्या ओलाव्याला ऊन्हं तापवायची. गावातल्या शेवग्याची, सीताफळीची पानं सोपटून जायची. वातावरणात सुन्नपणा भरून रहायचा. मन खिन्न व्हायचं. ऊन्हाच्या तावातच एखादी शिरगोळ लालबुंद झालेली कोंबडी, कर्कशपणे लांबरूंद सूर काढून कोकाटत रहायची. तिला साद दिल्यासारखा जोडीचा कोंबडा डगरीवर चढून भर उन्हाचा बांग द्यायचा. सारं विसंगत वाटायचं. ती शांतता आणि तिचा भंग सारं नको वाटायचं. पुढचात दळणासाठी धान्य घेऊन ते निवडीत उगीचच दारात बसायचं. अंगणात कोणाचं काहीतरी वाळवण असायचं. त्या निमित्तानं कोणी अंगणात आलंच तर बोलणं व्हायचं तेवढंच बरं वाटायचं. अशीच एकदा मी दारात उभी होते. आणि वाळवणाला हात द्यायला आलेल्या गंगाआजी मला म्हणाल्या, ये मास्तरणे, झालं का काम.. ?' • अग, ● झालं की.' " काय झालं म्हणतीस बापडे, ईळभर घरात रुटघुट करीत बसतीस. तुला कसं गमतं ग ?' त्या प्रश्नावरील माझं निर्जीव हसणं गंगाआजीना समजलं होतं. ओसरीवर बसत त्या मला म्हणाल्या - " मास्तरणे, नांगन्याची अडलीया म्हणं, कालपास्त तुला खबर मनू हाय ? नाही हो तुम्हाला कोण बोललं ?' ' साया गावभर बोभाटा पसारलाय नि तुला ठावं नाय ?" अंहं' [ सासू-सुनंचा वाद. घरात वाद वंगाळ आस्तो. आता बग, म्होरं देवानं काय वाढून ठिवलंय ? पण वंचळी पैल्यापस्न ढा नकभवानी. हाताखाली जावा टिकू दिल्या न्हायत्या, टिंगाणीन. आता त्या सुनला खाऊ का ठिऊ करतीया. मनू, गुणाची हाय बग जाता-येता खोकशी करती माझी. तिच्या नशीबाला भोग आलाय • डॉक्टर नाही का बोलावला ? ' डाक्तर ? मास्तरणे, तुला त्या वंचळोचा हिसका ठावं नाय ती अक्रोश । ४१