पान:रानवारा.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सरूनानीला तर सकाळी-सकाळी सजीव-निर्जिवातला फरकच कळेनासा व्हायचा की काय कोण जाणे म्हणायची - - 'फुकणी कुठं जाऊन बसली ? ह्या चुलीला यॅड आलंया. पेटीवल्यापस्न धूर वकतीया निस्ता. धडाधडा पेटायला काय झालं हिला ? सवतीवाणी मला पिडलंय हिनं. समोरचं नाना पहाटंच मोट चालवायला जाण्याच्या घाईत असायचं. बायकोशी बोलताना राग गिळून त्यांच्या तोंडून शब्दाचं गूळ-पेढं पडायचं- • राणीसाब, बैलाचं दावं कुठल्या महालात ठेवलंय ? हं. द्या. . . बरी आठवण झाली. आज तुमी काय अमृत करणार असाल, त्यात चटणी-मीठ ध्यान दिवून फेका, अन् होऽआमची पाठ फिरली की काम उरकायच्या पाठीमागं लागू नका. मघापास्न आमचा बा पाळण्यात का हासतूय त्ये बघा. दूध पाजून शांत करा त्याला मग बगा बाकीचा उद्योग. अशा घाई-गडबडीच्या, राग-लोभाच्या, शब्दाच्या फैरी कानावर पडायच्या. सकाळपासून माणसांचा चाललेला घाई-गोंधळ अकरावाजेपर्यंत निवळायचा. एक-एक करीत सारी आपापल्या उद्योगाला निघून जायची. दिवस सुगीच होतं. ज्यांच्या घरात थांबणारं कोणी नाही, त्यांच्या घरांना कुलुपं लागायची. शेतात न जाणारी, थकलेली बाया-माणसं घरात बसून असायची. मोगणाच्या-भुईमूगाच्या शेंगा तोडण्यात दिवस कारणी लावायची. धना बडवायचा, मका सोलायचा, आणि वाळवण राखायचं असलीही कामं उरकली जायची. दुपारच्या सुट्टीत शाळेतून येणा-या नातवंडाना जेऊ-खाऊ घालणं व्हायचं. कोंबड्या कुत्र्यावर लक्ष रहायचं. घराची राखणं व्हायची. संसाराला आधार असायचा. .... , घरात बैठी काम करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांचा दिवस हां हां म्हणता निघून जायचा. पण माझ्यासारख्या 'मास्तरणीचा ' दिवस कसा जात असेल? कार मास्तरची बायको 'मास्तरीण' या न्यायानं मला मास्तर- •णीची पदवी लाभलेली होती. अकरा वाजले, की गावात सामसूम व्हायचं घर एके घर याच क्षेत्रात माझं काम चालू असायचं. वातावरण निरुत्साही वाटायचं. गाव अगदी निर्जन बेटासारखं सुम्म व्हायचं कुठंतरी गावंदरीला गाढवाची ललकारी, नाहीतर कुत्र्याची एकाकी भुंक ऐकू यायची. पुन्हा शांतता. आक्रोश । ४०