पान:रानवारा.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

8 आक्रोश सुगीच्या दिवसात भल्या पहाटं घराघरात चिमण्या पेटायच्या. खुराड्यातल्या कोंबड्यांना जाग यायची. कोंबडं चढाओढीनं बांग द्यायचं. ‘उजाडलंय तर आम्हाला सोडा', असाच जणू त्यांच्या ओरडण्याचा हेतु असायचा. बाया झाडलोट करता करताच शिव्यांची पहिली ओंजळ खुराडयावर वहायच्या. चूल फुंकण्याचा, भाकरी बडवण्याचा, फोडणी टाकण्याचा आणि अशाच घरातल्या हरेक हालचालींचा आवाज कानावर येत रहायचा. झोप उडून जायची, पण उठायची घाई नसायची. अंथरूणात पडूनच असं शेजा-या पाजाऱ्यांच्या हालचालीचं वेध घेण्याचं मनाला जणू वळणच पडून गेलं होतं. घाई - गडबड, मधेच शिवीगाळ अशात सकाळ साजरी होत असायची. • आरं ये, माझ्या वाद्याऽ ! दिस डोस्क्यावर आलातरी वाण्या उदम्यावाणी झोपावं वाटतंय का तुला ? ये काळपडघाड, कूस बदलाया नाय सांगितलं म्या. ऊठ, नाय तर फुकणीच घालीन टकुयात.' शांतानानी रामप्रमहारात अशा पद्धतीनं तोफ डागायच्या. शेजारच्या ...