पान:रानवारा.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पायात पायतान हाय ! आमच्याबी हायती. की." “हायती, तर चांभाराकडनं शिवून आणून दे, आय भनीला घालायला. इथं कुणाला सांगतोस रं भाडू ?” cf 'ए, गप् बस रं सर्जा, काय लावलाय अगाऊपणा ? तुला बायका माणसाशी कसं बोलावं त्ये कळतं का ? मालू, रागाला येऊ नगस ग. ह्यो आडमुठा हाय निसता. त्याचं काय मनावर घिऊ नगस.' 21 " बरं, बरं. तू नको करूस त्याची वकिली ! जा गुमानं." " आमी तर चाललोच हाय. पण एक काम करतीस कां ? तुझा राग गेला नसलं, तर सांगतो. " " सांग की. एकच का, धा सांग की. " " एकच सांग, त्या डाकबंगल्यावर कोण माणसं हायती ?" “ ती व्हय ? त्यो त्यो सरपंचाचा शिव्या नि त्याचं दोस्त बसल्याती.' 39 ती गेल्यावर सर्जा म्हणाला, "बघ कशी सटकली धामणीगत. राजंऽऽ, हितं तुमची डाळ शिजायची न्हाय. त्ये रानपाखरू हाती न्हाय लागायचं." " सर्जा, तू तिला आसं ...लागाट तमाशातल्यावाणी बोलायला नको होतं. " “ का ? सरळ बोललो असतो, तर ती काय तुझ्या गळ्यात येऊन पडली असती ? आरंऽझाडावरची नागीण ती. जया बरी, निदान डंख तरी मारायची न्हाय; पण ही जात लई इखारी." HOCK " म्हणून तू लांबन दगूड मारलास व्हय तिला ?" "आरं पर तुला का एवढं झोंबतंय ? छट् ! नाव सोड. इदरकल्याणी हाय ती पोरटी.” डाक बंगला जवळ आला. दोघांची चाल मंदावली होती. पायाखालचा रस्ता अंधुक दिसत होता. पुढं चालणाऱ्या सर्जापुढं अचानक वेताची लांब छडी आडवी झाली. खाकी कपड्यातील जंगल अधिकारी त्याच्याकडं रागीट नजरेनं पहात म्हणाला, “हरामखोरांनो ! जंगलतोड करता, चंदन तोडता?” खजील होऊन त्यानं मोळी खाली टाकली. राजालाही जंगलखात्यातील चार लोकांनी घेरलं. - आणि ती इदरकल्याणी माली वस्तीवर त्यांच्या या अवस्थेचं चित्र रंगवून, पदराचा बोळा तोंडावर धरून हासत होती. ००० डाव : ३८