पान:रानवारा.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" खरं हाय गढचा. बेस हाय आयडिया." 2078 गवळयाची पोरं पुढं येताच राजा त्यांना म्हणाला, “ए, लेकानू. खडी फोडाय जाता व्हप रं पुढं ?. “ का ? काय झालं ? फ फारीस्ट आलाय ? " व्हय, व्हय. तुमचा बा तिथं डाकबंगल्यावर तुमचं बारसं जिऊन बसलाय, बरी वाघाच्या घरात शीळी पाव्हणी निघालीय." “ ममग काय करावं म्हंता आमी, राजादादा ? " “आरं, त्येला काय इचारता खुळचावाणी ? मोळ्या हितं फेका नि गाठा घर, खालतीकडनं, परीट वड्याच्या बाजूनं जा." सर्जा म्हणाला. भेदरून गेलेल्या पोरांनी पटापट मोळचा टाकल्या. घाईनं कुन्हाडीची पाती दांड्यातून काढून डोक्याच्या रुमालात खोवली नि नुसतं दांडं हातात घेऊन ती गावाकडं पळाली. CC ... सर्जा - राजाची दुक्कल कामाला लागली. चार मोळचांच्या दोन मोळ्या केल्या; डोक्यावर घेतल्या दूरवरचा कानोसा घेतला. सारं शिवार शांत होतं. शंकर सेक्रेटरीच्या वस्तीवर तेवढी गडीमाणसं राबत होती. त्याचं इकडं लक्ष नव्हतं. रस्त्याला लागताच सर्जाचं समोर लक्ष गेलं. डोक्यावरची मोळी फेकून द्यावीशी वाटली. पाय अडखळलं. त्यानं रुमालानं आपलं तोंड पुसलं, हाताला दाट दाढीचं खुंट लागलं. सकाळी दाढी केली नाही म्हणून तो स्वतःवरच चिडला. दूर दिसणारी माली बघता बघता जवळ आली होती. गुलाबी नव्या पातळात चालताना ती भलतीच लवचिक दिसत होती. काळ्याभोर केसाचा रेशमी अंबाडा तिच्या मानेला खाली झुकवीत होता. तिच्या केसाचा सुगंध सर्जाच्या नाकात शिरला, तिच्याकडं अधाशी नजरेनं पहात राजाला तो म्हणाला, "मला तुझी लई सई येत हुती... काल मी लई वाट पाह्यली तुझी." “ मग याचं हुतं राती. मी एकटाच हुतो. माझ्या फाटक्या चादरीत तुला घेतला असता." राजा डोळा मारून बोलला. पण- “एड, तोंड संभाळून बोल रं भाडू ! पायात पायतान हाय.' 17 46 ए आम्ही एकमेकात बोलतूय. तू जा गुमान सरळ वाटंन म्हणं डाव । ३७