पान:रानवारा.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ डाव मळयाच्या वाटनं सर्जा नि राजा चाललं होतं. सावज हेरून चाललेल्या लांडग्यासारखं वाटेनं घराकडं येणारं बायका-माणूस त्यांना पाहून दूरूनच जमिनीला नजर खिळवून येत होतं. त्यामुळं त्यांच्या आशाळभूत नजरा त्या बाईमाणसांच्या अंगावर स्वैर फिरत होत्या. सान्या गावावरून ओवाळून टाकलेल्या लिंबाच्या जोड फोडी सारखी ही दुक्कल गावातल्या भुरट्या गावाला भयप्रद होती. शेतातल्या पिकाच्या चोन्या चोऱ्या, हातभट्टी चालवण आणि गावातल्या पोरीबाळींची छेड काढणं हे त्यांचं रोजचं उद्योग झालं होतं. त्याबाबत कोणी काय म्हणायची चोरी, लागलीच त्याच्या घराला अगर गंजीला आग लागायची. भूत म्हणता ठाण्यावर तक्रार भूतबाधा असा व्हायचा. शिवाय पोलीस केली तर उपयोग होत नव्हता. उलट ज्यानं तक्रार केली असंल त्याच्यावर काही छोटी-मोठी संकट अकस्मात येत. हे सारं गाव ओळखून होतं, पण मृग गिळून गप्प होतं. निनावी पत्र तर हवेवर जायचं, काही उपयोग व्हायचा नाही. गावातली हातभट्टी ती दुक्कल चालवत असे. पोलीसांचा हप्ता वेळवर पोहोचत होता. अधून-मधून सर्जाच्या मळघातल्या वस्तीवर प्रकार