पान:रानवारा.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वनवासी झाला नि मलाच वनात पडल्याणी झालं. घरदार- शिवार मला खायाला उठलं. म्हणलं आता ह्यं सारं इसरायला हावं. इळभर कामात हाया लागलो. इसावा म्हणून घेतला नाय. पण मन काळजीनं पोखरून काढल्यानं. तुझं पत्र नाय. त्याचं बी पत्र नाय. वाटलं. •..काय माझ्या राम-लक्ष्मणाचं चाललं आसंल .... पण ‘ नाय. बाप्पा. मी तुमचा राम नाथ आन् लक्ष्मणबी नाय. राम लक्ष्मण दोन्हीबी आपला जयरामच. त्यो लई मोठ्या मनाचा हाय बाप्पा . मी . मी लई कद्रू मनाचा. बाप्पा तुमचा मुलगा म्हणून माझी लायकी नना- J ' अं हं. आसं बोलू नाय पोरा. तुला का मी वळखत नाय व्हय ? लहानपणापास्न तुला शेत-शिवाराचा वढा हुता. ह्यो रानवारा तुला तुझ्या बाळपणापास्त साद घालीत आला नि तू भुललास पोरा. त्याच्या शुद्ध णाला स्वैरपणा . . . स्वातंत्र्याला. त्यात तुझं चुकलं आसं कसं म्हणू पोरा ?.. त्यात काय बंगाळ नाय ह्यो रानवारा कधी कुणाला बंगाळ वाट .. C दावणार नाय उणं शिकवणार नाय .. कधी वंगाळ व्हणार नाय झालं गेलं इसर पोरा... आसवं गाळू नकोस . रानवारा । ३२ त्याच्या नादी लागणाराचं पुन्हा असा बाप्पाच्या मांडीवर डोकं ठेवून शिवराम किती वेळ उसासं देत होता. गर्भाळल्यालं आभाळ शिवराशी येऊन बिलगलं होतं. वारा घोंघावत होता. सान्या शिवाराचं अंग हलवून घुसळून काढीत होता. झाडं झुलत होती. डोलत होती. येणाऱ्या पावसाला आधीच चौ-या ढाळीत होती. पिकं उभ्या जागी नाचत होती. रानपाखरांनी किलबिलाट मांडला होता. या झाडावरून त्या झाडावर ती भराया मारीत होती. पावसाचा मारा सुरू होईपर्यंत, त्याचं ठिकाण पक्क ठरणार नव्हतं. रानवारा. सान्यांना हालवीत होता. भिववीत होता. टपोऱ्या बोरासारखं पावसाचं थेंब रानभर आदळू लागलं रानवारा भरारत होता. अजूनही शिवरामच्या गालावरून एखादा चुकार थेंब ओघळत होता आणि बाप्पांचा हात त्याच्या पाठीवरून फिरत होता.. ooo