पान:रानवारा.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फार दूरवरून त्यानं बाप्पांना पाहिलं होतं. ते इंजिनाशी ओणवून उभं होतं. अजूनही ते ओणवेच होते. काही तरी दुरूस्ती चालली होती. त्यांच्या अगदी जवळ जावून उभा राहिला, पण त्यांची एकाग्रता भंगली नाही. बाप्पा कुणासाठी करतात एवढं कष्ट ? कुणाकडंही तक्रार न करता ? त्यांना कधी ह्या साऱ्याचा वैताग येत नसंल ? शीण येत नसंल ? ते कधी •सांगतात का ? कोणावर वैतागतात तरी का ? आणि आपण ? ? • त्याचा कंठ दाटून आला. स्वतःला तो आवरू शकला नाही. एखादा कडा कोसळावा तसा तो बाप्पांच्या पायावर कोसळला. त्यांचं पाय धरून म्हणाला.. ‘बाप्पा... बाप्पा मी.. पुढंच त्याला बोलवेना. दुःख कंठात दाटून आलं होतं. सारं शरीर त्या दुःखानं गदगदू लागलं. 4 ... बाप्पांनी खाली बसून त्याला उराची कवटाळला. त्याचं अचानक येणं आणि घायाळ होऊन कोसळणं त्यांना बुचकळघात पाडून गेलं. • शिवराम शिवा बाळा.... काय रं ह्म आसं ? येड्यावाणी रडतूस ? आं ? पत्र नाय. सांगावा नाय. काय ख्याली-खुशाली नाय काय आवचित आलास नि पोरा रडतूस ? नोकरी मिळाली नाय म्हणून ? ना मिळू दे ही काळी काय आपल्याला कायबी कमी करणार नाय ... अं ? उगी ...गप्प... मर्दा बायकावाणी आसवं काय म्हणून गाळायची ? मी तुला आंतर दिलं का ? कामधंदा बगायला गाव सोडून जा आसं तरी बोललो का कधी ? तुझं तुलाच काय वाटलं कुणाला ठावं, तुझं मन चकारलं, गेलास. मी तुला नको म्हणलं नाय. तुला रूचलं नसतं म्हणून म्हणलं नाय. तुला जे काय वाटलं ते जयरामइषयी वाटलं आसलं. पण माझा इश्वास हाय पोरा, जयराम म्होरं कितीबी शिकला तरी त्यो तुला आंतर देणार नाय. लई जीव हाय तुझ्यावर त्येचा भेटला आसलं ... .. ... ... ... J बाप्पा...' तुला .. ... 'हो भेटला काय बोलला ? इथंन जातानाबी तुझी गाठ पडली नाथ म्हणून त्याचा जीव किती घोटाळत हुता. त्याच्या मायेचा अंदाज तुला नाय पोरा तुमी दोघं मला राम-लक्ष्मणावाणी. त्यो गेला त्यामागं तूबी गेलास तुमी रानवारा । ३१