पान:रानवारा.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

घेऊन स्टेशनवर आला. गाडी लागलेली होती. पुढच्याच बाकड्यावर बसून त्यानं पाठीमागं डोकं टेकलं. डोळे गच्च मिटून घेतलं, पण मनावरची चित्र मिटत नव्हती. पुसली जात नव्हती. पापण्याच्या कडा पुन्हा पुन्हा ओलावत होत्या. पुरात बुडता बुडता काठाला लागावं, तसं पोहण्याचा आनंद लाभला नव्हता पण जीव वाचल्याचं त्याला समाधान होतं. आता तो मळ्यात पोहोचला. गवळचाच्या डोंगरावरून आभाळानं काळी फळी उभी केली होती. अंगठ्याएवढी पाखरं थव्यानं आभाळात भराज्या घेत होती. भरकून खाली येत होती. गर्भाळलेल्या आभाळानं रान धुंदावलं होतं. उभं पिक गप् होतं, पण त्याच्या कानगोष्टी हळुहळ चालल्या होत्या. पायाचा आवाज जवळ येताच एखादं लाव्हार बांधाडातून गप्पकन् उठत होतं. भरला दागा खावून पाखरं चांगलीच पोटाळली होती. अंगाच्या जडशीळपणानं त्यांची भरारी मंदावली होती. सारं रान तृप्त होतं. ओढ्याचं पाणी झुळझुळत होतं. जण तृप्त शिवारच ढेकर देत होतं. ओढयाच्या काठाकाठानं तरंगणाऱ्या टिटव्या शिवराम जवळ आला तरी तिथल्या तिथच उडत होत्या पण उडून दुर जात नव्हत्या. लाल शेपटाची लहान लहान पाखरं तरवाडाच्या-निरगुडीच्या फांद्यावर पाठशिवणी खेळत होती. ओढयाच्या काठावर बिळा-बिळातून खेकडं पुढं सरकलं होतं. शिंगासारखं डोळं काढून चाहूल घेत होतं. शांत डोहात मास्यांचा फेरफटका चालला होता. एक डोकऱ्या डोहातच एका बाजूला स्थीर होऊन त्रयस्थपणे 'चिगळयाची ' वळवळ न्याहाळत होता. आपलं कल्ल्याजवळचं लहान लहान पंख तो केव्हातरी मंदसं हालवत होता. सारं वातावरण भरल्या- सारखं स्थीर-गंभीर होतं. त्यात आस होती, ओढ होती, आतुरता होती. सारं शिवार कुणाची तरी वाट पहात होतं. आतुरतेनं. म्हणूनच की काय शिवाराच्या छातीची धडधड थोडावेळ थांबली होती. कोणाची तरी चाहूल घेत होती. कोणाची ? आभाळ भरून आलं होतं. वारा लपून बसला होता. सारं शिवार अबोल झालं होतं. आगमनाच्या आधीचं मूकेपण, बावरलेपण, औसुक्य सारीकडं भरून राहिलं होतं. पाऊस येणार होता. लक्षलक्ष हातांनी साया रानाला कुरवाळणार होता. त्याच्या आगमनासाठी हे शिवाराचं स्वागत ! रानवारा । ३०