पान:रानवारा.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.... पंधरा-वीस मिनिटात तो पूर्णपणे बदलून गेला. आपला खिसा जयरामच्या हातावर रिकामा करीत तो त्यास म्हणाला, 'मी उद्या गावाकडं जातो. खोलीवर खर्चासाठी पैसे आहेत. पुरतील मला. हे पैसे तू तुझ्या खात्यावर टाक. हाडना हाड दिसतंय. तब्येतीला जप. आई-बाप्पांची काळजी करू नकोस. आणि माझी तुझ्या भाऊची काळजी करू नकोस. वाईट वाटूनही घेऊ नकोस. तुझा भाऊ तुझ्याइतका कष्टाळू नाय. सोशिकही नाही. मनाचा मोठा नाय. मी. मी लई कद्रू मनाचा हाय रं जया, मला विसर. बाप्पांची आठवण ठेवून काय करायचं ते कर. खूप शिक. मोठा हो. तू मनानं मोठाच हाईस. लौकिकानंही हो. आणि हे बघ वाटलं तर कधीही गावाकडं निघून मी तुला दुसरीकडं कॉलेजात घालीन. कायबी कमी पड़न देणार नाय .. कोपऱ्यावरून वळताना त्यानं पुन्हा त्या वसतिगृहाकडं नजर टाकली. रूम नंबर अकरामधे जाणारा पाठमोरा जयराम त्याला दिसत होता. ... लोकल पकडून तो खोलीवर आला. आपला परत गावी जाण्याचा वेत त्यानं आपल्या सोबत्यांना बोलून दाखविला. 'अजून वाट बघ. सं भरल्यातीस. नोकरी मिळंलच. कुठंतरी मार्ग सापडलं. दम धर दम थोर आसतो. समद्यापेक्षा गावी जाऊन काय करणार ? शेतीच ना ? शेतीत काय पाह्यलंस ? " .. ' सारं जग.' तो मनातच बोलला. दिवसभराच्या झगझगीन आंबून गेलेली सोबत्यांची शरीरं केव्हाच झोपंच्या स्वाधीन झाली, पण शिवरामला झोप येईना. जयरामच्या आठवणीनं राहून राहून त्याच्या पापण्या ओलावत होत्या. केव्हातरी त्याचा डोळा लागला. पण ती गाढ झोप नव्हतीच अर्धवट झोपेत त्याला जयरामच्या वसतिगृहातील दृश्य दिसत होती, आणि मनाच्या बेचैनीत तो दचकून जागा होत होता. मधेच गावाकडच स्वप्न पडायचं. गर्भाळल्यालं आभाळ, भुसभुसीत, वापसा आलेलं. शेत बी पेरायची घाई. तिपन धरायला बिगीबिगीन पुढं धावायचं आणि अंथरूणावर पाय घसरून जाग यायची. सकाळी तो उत्साहानं सारी बांधाबांध करून सोबत्यांचा निरोप ... रानवारा । २९