पान:रानवारा.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" जया तू एवढा सोशिक कसा बनलास ? काय म्हणून तू एवढी चिकाटी दाखवतोस ? लाचारी पत्करलीस ? काय म्हणून ? का ? का ? " ( भाऊ .. भाऊ, तू रडतोस ? रडू नकोस तू. तुझ्या बाप्पांच्या मातीत राबणाऱ्या हातांनी, ऊन्हात पोळणाऱ्या पाठींनी, थंडीशी झोंबणाऱ्या कष्टाळू वृत्तींनी मला हे सोसण्याचं बळ दिलंय. तुम्ही जे करता ते मला जमण्यासारखं नव्हतं म्हणून मी हे स्वीकारलं. भाऊ बाप्पांना, आईला- कोणालाच यातील अक्षरही सांगू नकोस. माझी शपथ आहे तुला. आरे तुम्ही उजाडल्यापासून अंधार पडेपर्यंत राबत असता. उन्हा-पावसात, थंडी वायत, अखंड कष्टत असता मी इथं सावलीत आहे. फक्त दोन अडीच महिने हा राक्षसी छळ पोसायचा बस्स ! त्यानंतर सरळ-लेव्हलमध्ये सारं काही. भाऊ, तू एवढा हळवा कसा होतोस रे ?... उलट मला तुझंच फार वाईट वाटतं. मला इथं जेव्हा जेव्हा असह्य झालं तेव्हा तेव्हा मला तू आठवलास. . बैलाबरोबर राबणारा, इंजिनाबरोबर धावणारा, आभाळाकडं बघून पावसाला साद घालणारा. मी त्यातून प्रेरणा घेतली भाऊ काहीतरी मनासारखं मिळवायचं असेल, तर काहीतरी मनाविरुद्ध सोसायलाही हवं. हे जीवनाचं तत्त्वच आहे. पण मला ते तुझ्या आठवणीनं समजलं म्हणून भाऊ, तू रडू नकोस नाहीतर माझं आयुष्याशी झुंज द्यायचं बळ गळून जाईल. भाऊ, माझी शपथ आहे तुला. यातील कोणाला काही सांगू नकोस. मी अगदी आनंदात आहे असंच घरी सांग. खरं ते थोडं जरी बाप्पांच्या कानावर गेलं तर ते हाय खातील परत यावे लागेल मला परत यायचं नाही. मला • मी विनंती करतो तुला भाऊ, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना ? मग तू एवढं कर पाहिलंस ते मनातच ठेव, ठेवशील ? .. फक्त माझ्यासाठी माझ्या ध्येयासाठी 'जयाऽ' शिवरामला पुढं शब्द फुटेना. अश्रू आवरेनात. आजवर तो काय समजत आला नि आज काय समजला होता ? खन्या जगाचे भेसूर भयानक रूप त्यानं पाहिलं होतं. जयरामचं प्रेमळ, सुकुमार मन त्या जगाशी टक्कर द्यायला उभं होतं आणि आपण दोन्ही ठिकाणी माघार घेऊन स्वतःवर प्रेम करीत होतो. त्याची विचारधारा आरपार दुभंगली. रानवारा । २८