पान:रानवारा.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देखरेख कोण करतं ? पुराचं गढूळ, गदळ पाणी नाकातोंडात जाऊन जीव गुदमरावा अशी त्याच्या मनाची स्थिती झाली होती. फाटकाच्या अलिकडंच एका झाडाच्या आडोशाला जयरामनं त्याला थांबवलं. दबक्या आवाजात तो त्याला म्हणाला, ' भाऊ, तू आता जे काही पाहिलंस ते रँगिंग बाहेर हे कोणाला सांगू नकोस. त्याचा काही उपयोग होत नाही. काही प्रयत्न झालाच तर आमचा छळ वाढेल.' " पण काय म्हणून हे सहन करायचं ?" • शिकायचं म्हटल्यावर हे आलंच आग लाव त्या शिकण्याला 6 6 शु ऽऽ हळू बोल हे फक्त अजून महिनाभर चालेल.' ' पण तोवर हे का सहन करायचं ? तक्रार करता येत नाय ? " • त्याचा उपयोग होत नाही. तो शिक्षणाचाच एक भाग म्हणून सहन करायचं. आता तू माझा भाऊ म्हणून सांगितलं असतं, तर तुझ्याशी एवढंही भेटायला मिळालं नसतं. शिवाय आणखी काही दिव्यातून जावं लागलं असतं.' ... 'जया, काय रं वला आलीय तुझ्यावर, या शिक्षणाच्यापायी ? वाळून चिप्पाड झालास रं, जया, सोडून दे आसलं शिक्षण, मी परत जाणाराय. तू पण चल, दुसरं कुठलं तरी शिक्षण घे. मला फार मोठा धक्का बसलाय इथं येऊन. आपण उद्याच जाऊ.' ' तू जा भाऊ. मला नाही येता येणार. मी रात्रंदिवस अभ्यास केला. बाप्पांनी एवढा पैसा खर्च केला. त्यासाठी शेतात राबतात ते. तू पण जाऊन पुन्हा तिथं राबणार आहेस. हाताशी आलेल्या स्वप्नावर थोड्यासाठी पाणी ओतायचं नाही मला. दीड महिना हा छळ सोसल्याशिवाय काहीतरी लाभत नसतं.' ‘जया .. हे सोसत राहणार ? येणार नाहीस ?' नाही, मी इंजिनियर होण्यासाठी इथं आलोय. मला ऑफिसर व्हायचं. अभ्यासाबरोबरच समाजानं म्हण, किंवा नियतीनं म्हण लादलेला हा छळही सहन करायला हवा.' " .. रानवारा । २७