पान:रानवारा.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एका म्होरक्यानं त्याला विचारलं- 'काय पैलवान, कोण पाहिजे ?’ • जयराम, इथंच असतो ना ?' या प्रश्नासरशी त्यानं आत वळून आवाज दिला. अबे ए जयरामजीके बच्चे, हो गया तेरा खाना ? " कोई मिलने आया है। जल्दी कर ! ' आणि तो मघाचा डोक्यावर थाळी घेऊन जेवणारा, थाळी खाली घेऊन हात घुऊन वळला. जयराम ! शिवरामच्या काळजात चर्र झालं. जयराम कपड्यावरचं रस्याचं डाग गडबडीनं धुऊन ओशाळ्या नजरेनं शिवरामपुढे येऊन उभा राहिला. ‘क्यो जयरामजीं ये कौन है साला ?' ( म .. माझे वडिल, यांच्या शेतात काम करतात.' " याद रख, कुछ गडबड करेगा तो सामना हमारे साथ है ।' जयरामनं भीत भीत मान डोलावली. जयरामबरोबर बोलण्यासाठी म्हणून शिवराम त्याच्याबरोबर व्हरांड्यातून पटांगणाकडे जात होता. त्याला तिथं दोघेजण एकाला दमदाटी करीत असल्याचं दिसलं. दाढीचा एक एक केस उपटून तो विव्हळत होता आणि ते दोघे हसत होते. त्यातला एक म्हणाला. आज तारीख पाच. पाच केस उपटलेस. तारीखवार केस उपटायचे आमच्या समोर ' नाहीतर दुसरीकडचे उपटून देशील.' या विनोदावर ते घोड्यासारखे खिंकाळले. • चल भाऊ' जयरामनं शिवरामला पुढं ढकललं. तो काही बोलणार तोच त्यानं त्याचा खांदा दाबला. या दोघांना पाहताच त्यांनी धमकावलं ए जयरामजीके बच्चे त्या पैलवानाला सांग नाकासमोर जा नाहीतर गुढग्यातला मेंदूपण बाहेर निघेल. ' C साया प्रकारानं शिवराम भयभित झाला होता. आपण काय पहातोय हे त्याला समजेनासं झालं होतं. जयरामला डोक्यावर थाळी घेऊन जेवण का घ्यायला लावलं होतं ? त्या मुलाच्या दाढीचं केस का उपटायला लावलं होतं ? ही मुलं निष्कारण एखाद्याला का छळत होती ? यांच्यावर रानवारा । २६