पान:रानवारा.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असू द्या भिकंच. पण मला मातीत राबायची मालकशाही नको.' • शिवराम तुझी कशी समजूत काढावी कळत नाय मला. तू शांत हो. खवळलास की अविचार करतोस. मी तुझा वैरी नाय. माझं ऐक. तिथली हवा, खाणंपिण तुला सोसायचं नाय. अंगी लागायचं नाय. नोकरीबी आरामाची नाय.. 1 . C .. त्या सान्याचा मी विचार केलाय. मला ते काही सांगू नका.' C मग म्हणणं काय तुझं ? मी काय करू तेवढं सांग.' तुम्ही मला पैसे द्या. जयरामला दिलं तेवढंच. त्याच्यात माझ्यात तुम्हाला फरक वाटत नाही ना ? मग द्या तेवढीच रक्कम त्या शिवाय मी अन्नपाणी घेणार नाय. मेलो तरी .. भरलंय पण " शिवराम ! डोस्क्यात ? आसं • काय खुळ तुझ्या वाईट वंगाळ बोलण्या इतकं तुझं आई-बाप कसाब हाईत असं वाटतं तुला ? नोकरीचं खूळ तुझं तूच भरवून घेतलं अमशील मर्दा. जाऊ दे. तू तुझ्या लहरीनं वागणार. आमचा इलाज नाय देतो पैसे. त्याच्या इतकंच तुलावी देतो. तुझं चुकीचं नाय. हिशोबाला सरळ. कामाला सरळ-इमानी पण एकांदी गोष्ट तुझ्या डोस्क्यातच तिरकी शिरती. इलाज नाय कायबी जीवाला तकलीब देऊ नगस. दिस मावळायच्या आत पैसे देतो. तुझ्या बापाचा हा शब्द हाय. इश्वास ठेव. चल. जेव माझ्याबराबर. मी बी जेवलो नाय रं.' आणि बाप्पांनी आपल्या हातानी त्याला वाढलं आपण जेवलं. तो पोटभर जेवलेला पाह्यला, तेव्हा त्यांनी पायात वाहना चढवल्या. दरवाज्यातून बाहेर पडताना धोतराच्या सोग्यानं पापण्याच्या कडा हळूच कोरड्या करून ते झपाट्यानं मळयाकडं गेलं. बाप्पांनी संध्याकाळी शिवरामच्या पुढचात नोटांची चळत ठेवली. आई-आजी कानकोंडया होऊन बघत होत्या. कोणीच काही बोलत नव्हतं. यांना बाप्पांनी शेतावरच ताकीद दिली होती. दुसऱ्या दिवशी जयरामसारखीच त्याची निघण्याची तयारी झाली. फराळाचे पदार्थ, इतर सामान व्यवस्थित बांधून झालं. घरात उदाम वातावरण पसरलं. त्याला निरोप कोणीच देत नव्हतं. कोपयात बसून रानवारा २३