पान:रानवारा.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आजी उसास टाकीत होती. सामान बांधता बांधता आई डोळयाला पदर लावीत होती. आत बाहेर करणारं बाप्पा भिंतीवरल्या तसबिरी उगीचच न्याहाळत होतं. पायाच्या अंगठ्यानं भुई टोकरीत शिवराम वेळ काढीत होता. सामानाचं ओझं घेऊन बाप्पा स्टँडवर शिवरामला पोहचवायला आलं. तेव्हा त्याच्या मनाचा कोपरा कुठंतरी ओलावला होता. आता परत फिरावं, माघार घ्यावी, चुकलं म्हणावं, असा बाळविचार त्याच्या मनात रांगू लागला पण पुन्हा तो सावरला. ताठरला. आपण असं विरघळायचं नाही. वाकायचं नाही. साऱ्यांना धडा शिकवायचा. आपलं नशीब शोधायचं. तो मुंबईला येऊन दिड महिना झाला होता. दहा बाय दहाच्या खोलीत ते सहाजण नांदत होते. नोकरीच्या शोधात शिवराम अनेक ठिकाणी चकरा मारत होता. कुठेतरी गिरणीत, कोणत्या तरी कारखान्यात त्याला नोकरी हवी होती. कामगार म्हणून घेतलं तरी बस् होतं. पण एवढी नोकरीही अजून त्याच्या हाताशी आली नव्हती. टांकसाळीत कामगाराला पगार चांगला होता. तिथला एक अधिकारी खोलीतल्या एकाचा गाववाला होता. त्याला शिवरामच्या नोकरी विषयी खटपट करायला सांगितलं होतं. त्याला हजार रुपये आगाऊ रक्कम म्हणून दिलंही होतं. नोकरी लागल्यावर बाकीचा आकडा पूर्ण करू म्हणून सांगितलं होतं. तोही तेवढ्यावर राजी होता. पण काम लागण्याचं अजून लक्षण दिसत नव्हतं. रोज नवीन नवीन कारण पुढं येत होतं. इतर ठिकाणी ही हेलपाटं चाललं होतं. कुठच डाळ शिजत नव्हती. सान्याच गोष्टीला तो उबगला होता. नोकरीसाठी या ऑफीसातून त्या ऑफीसात, मॅनेजर-मालक अधिकारी यांच्यापुढे लाचारीनं उभ रहावं लागत होतं, आणि शिवरामला हटकून अशावेळी मंगलकार्याची जेवणावळ चालू असता बाजूला उभे राहणाऱ्या लाचार गरीबांची आठवण यायची. अशा वेळी तेथून वाट फुटेल तिकडं धावत सुटावं आणि मळयात जाऊनच थांबावं असं क्षणभर त्याला वाटायचं. बाप्पांची चार-सहा पत्रं आली होती पण मुंबईला पोहचल्याचं एक पत्र पाठवल्यानंतर त्यानं नंतर पत्रच पाठवलं नव्हतं. त्यांच्या प्रत्येक पत्रात रानवारा | २४