पान:रानवारा.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जाताना त्याच्याशी बोलणं नको म्हणून शिवराम न सांगता बाहेर निघून गेला तो जयराम गेल्यानंतरच परतला. त्याला समजलं जयरामला बराच पैसा खर्च केला होता. म्हणून घरातली माणसं खर्चाची आकडेवारी खुशीत येऊन सांगत होती. पण तो कुस्तीत कधी हरल्याचं कुणाच्या गावी नव्हतं. नेहमीसारखी बाप्पांनी साधी चौकशी तरी करायची होती. पण इंजिनियर पुढं शिवराम कचराचं वाटत असावा. त्यांनी चौकशी केली नाही आणि शिवरामला वाटू लागलं जयरामचं आणि आपलं आंतर असंच वाढत जाणार, ते संपवायचं असेल तर नोकरी पाहिजे. जगू मोकाशी म्हणत होता. 'मुंबईत पैसा मोजला की पाहिजे एवढचा पगाराची नोकरी मिळंल.' पैसा ! जयरामला इंजिनियर करायला पैसा ओतला जातो. मग आपणास नोकरी मिळवायला पैसा मागितला तर काय चूक ? पाच हजार रुपये मोजून द्यायचं आन् मुंबईत नोकरी मिळवायची. जयराम इंजिनियर होईल तेव्हा आपणही लाख कमावलेलं असंल. त्याच्या इतकाच मला मान मिळंल. त्याच्यासारखं माझं कौतुक होईल. त्याच्यासाठी फक्त निकराचा हट्ट करायचा, बस्स ! शिवरामनं सकाळपासून काही खाल्लं नाही. आईनं- आजीनं चौकशी केली. ऊन्हं डोक्यावर आली आणि आई धास्तावली. त्याच्या अंगाला हात लावून पाह्यला. तोंडावरून-पाठीवरून हात फिरवला. भिजल्या आवाजात ' काय दुकतं खुपतं का' म्हणून चौकशी केली. तिला चिन्हं बरं दिसेना बोलभांड पोरानं अगदीच बोलणं टाकलं होतं. आणि आज तर काही न खाता मिठाची गुळणी घेऊन बसलं होतं. शेतात दशम्याबरोबर घरचा निरोप गेला आणि काही न खाता उसाला पाणी पाजायचं निम्म्यातच बंद करून बाप्पा काळजीनं घरी आलं. माचावर पडलेल्या शिवरामचं सारं अंग त्यानी चाचपून पाह्यलं. ढंकळ पाण्यात विरघळावा तसं बोलत होतं. पण शिवराम तोंड उघडून घडाघडा बोलत नव्हता. बाप्पांच्या मनात चलबिचल झाली. दुखच्या आवाजात त्यांनी विचारलं. 'शिवराम, परवाच्या कुस्तीचं मी विचारलंच नाय बघ. आवलगामी लागलं तर नाय ना ?" उहुं , रानवारा । २१