पान:रानवारा.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणून त्यांच्या फायनलच्या शिक्षणालाही मान मिळाला. पण आपण ? अगदीच पायथ्याशी राहिल्याची बोच त्याचं काळीज पोखरू लागली. J त्याची आई-आजी तशा अडाणी बायका पण त्याही ' इंजनेर व्हणार जयराम म्हणून याच्या त्याच्यापाशी बढाया मारत होत्या. जयराम पुण्या-मुंबईच्या कॉलेजाकडे पत्रव्यवहार करण्यात गुंतून गेला होता. बाप्पांनी तर कमालच केली. जयरामचा निकाल लागल्यापासून सारा शेत च्या कामाचा भार शिवरामवर टाकून ते जयरामभोवती घोटाळू लागलं. गावात याच्या त्याच्यापाशी जयरामच्या हुशारीच्या फुशारक्या मारू लागल्या खरं तर मळयात इरिगेशन करायचं किती जरूरीचं होतं पण त्यासाठी तलाठयापासून मामलेदारापर्यंत शिवरामच हेलपाटे घालत होता. ऊसाला पाणी पाजायचं तर इंजिन बिघडलेलं. स्टार्टर साताऱ्याला जाऊन आणावा लागला. हरण्या बैल आज रला तर गुराच्या दवाखान्यात न्यायला शिवरामशिवाय कोणी नव्हतं. गाय व्याली, तिला खोंड झाला. कौतुक कोणाला नव्हतं सारीजण जयरामच्याच कौतुकात गुंतलेली. आजारलेल्या बैलाचं आणि व्याल्याल्या गायचं बघता बघता शिवराम वैतागून गेला. आपल्याकड कोणाचं लक्ष नाही. आपली काणाला किमत नाही, याच जाणीवेनं घराकडं वळताना त्याचं डोकं उणक लागलं. कपाळावर अठी चढू लागली. यातून विरंगुळा म्हणून शेजारच्या गावच्या यात्रेला जायचं त्यानं मित्रांजवळ ठरवलं. कुस्तीच्या फडात उतरायचं म्हणून तो खुशीत होता. त्यानं आपला बेत बाप्पाना सांगितला मात्र आणि कधीं नव्हे असा कोरडा नकार त्यांनी दिला. उलट त्याला मात्र वाटलं होतं सारं नेटाचं काम त्यानं स्वतःच्या हिमतीवर रेटलं म्हणून बाप्पा त्याचं कौतुक करतील हुरुपानं कुस्तीला पाठवतील. पण चालता चालता गचकन् खड्यात पाय जावा तसा बाप्पांनी त्याला धक्का दिला होता. .. रानवारा । २० .. आणि घुमसत असलेलं लाकूड राख बाजूला होताच वारा लागून धडाडून पेटावं, तसा तो मनात पेटून उठला. आपला राग शब्दात न दाखवता, कोणासही न सांगता तो यात्रेला निघून गेला. अस्वस्थ मनस्थितीत खेळलेल्या कुस्तीत तो हरला आणि जणू आगीत तेल पडलं. परत आल्यावर त्यानं सर्वांशो अबोला धरला. जयराम मुंबईला गेला. पण