पान:रानवारा.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

करीन मी.' & इतकं सोपं नाय ते. चार दिवस डोकं शांत ठिऊन विचार कर. तुझ्या मैतरास्नी विचार. मग मला सांग.' चार दिवसांनीही शिवरामनं आपलं उत्तर दिलं होतं. मित्रांचा विचार घ्यावा असं त्याला अजिबात वाटलं नाही. वासरानं गाईकडं ओढ घ्यावी तसं त्याचं मन शेतीकडं ओढ घेत होतं. ते त्यालाही आवरता येत नव्हतं. इतराचा विचार घेण्याची जरूरी नव्हती. त्याच्या ठाम निर्णयानं बाप्पा मनात हळहळलं. चटपुटलं; पण प्रत्यक्षात शिवरामाकडं त्यांनी असं पाहिलं की ते जणू त्याचा अंदाज घेत होतं, हिंमत मोजीत होतं. त्याच्या नजरेच्या प्रश्नाला शिवरामानं विश्वास दिला होता आणि दोन हाता ऐवजी चार हातांनी शेतीची मशागत सुरू झाली. दुपटीनं धान्य पिक् गलं. आधुनिक शेतीचं आराखडं आखलं जावू लागलं. द्राक्षं-नारळीच्या लागवडीचा विचार होऊ लागला. शेती- विज्ञानाची पुस्तकं घरात येऊ लागली. बाप-लेकात दोस्तांसारखी चर्चा रंगू लागली. शिवरामाच्या शिक्षणाची खंत बाप्पा विसरून गेलं खंत कधी आठवलं तर ' झालं हेही काही वाईट नाही,' असे ते म्हणायचं; इतकं समाधान त्यांना लाभलं होतं. पण आता द्वारा फिरला होता. जयरामच्या परीक्षेचा निकाल लागला आणि मारे कुटुंबच जणू शिवरामचं अस्तित्व विसरलं. मेरीट, अॅडमिशन, फी, होस्टेल आणि जयरामची बुद्धिमत्ता याच विषयावर घरात चर्चा चालू असायची जयरामचं कौतुक. त्याच्या शांतपणाचं. त्याच्या चिकाटीचं, त्याच्या बुद्धीचं 'इंजिनियर इंजिनियर.' घरात या एकाच शब्दाभोवती सारं कुटुंब गिरक्या घेत होतं. त्याचं चटकं फक्त शिवरामला बसत. जयरामचं कौतुक करताना शिवरामशी तुलना होते याचं कुणाला सोयरसुतक नव्हतं. त्याचं अस्तित्व फक्त तुलनेसाठी जमेस घेतलं जात होतं. इतर वेळी त्याच्या जेवणाखाण्याकडेही कोणाचं लक्ष दिसत नव्हतं. तो घरात आला. गंला कोणी जमेस धरेना शिवराम विलक्षण बेचं नझाला. यांच्या लेवी आपण शेतात रावणारं जनावर. ह्ऽऽ ! बाप्पा शेती करीत; पण त्यांची गोष्ट निराळी. ते त्यांच्या आई- बापास एकुलते होते. त्याच्या काळात शिक्षणाचा एवढा गहजब नव्हताही. रानवारा । १९