पान:रानवारा.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काठावर पास झालो. ' ' त्या गोष्टीचं येवढं मनावर घेऊन शाळाच सोडून देणार का ? कुस्तीत हारलास म्हणून कुस्ती सोडलीस का कधी ? एकांद्या साली कमी पिकलं तर तुझ्या बानं शेती सोडून दिलीय का ? अं ? • शेतीची गोष्ट निराळी. शिक्षणाची निराळी. मी लई विचार केलाय. बाप्पा, मला यापुढं शिक्षण जमणार नाय. तुम्हाला शिकायची हौस हाय तर जयरामला लई शिकवा.' ‘ आता मातूर कमाल झाली तुझी. तू एकाएकी घाव घातलास बघ. माझ्या ध्यानी मनीबी न्हवतं आन् तुला ही काय बुद्धी आली रं ? गावात म्हारा-टोराची पोरं शाळा-कालीज शिकून हापीसर - सायेब बनत्याती नि तू धावीच्या उंबरावर थांतून शेती करायची म्हंतोस ? ' खाल मान घालून शिवराम ऐकत होता. बराच वेळ दोघं काही न बोलता बसून राहिलं, सुन्न होऊन बाप्पा गवताच्या काडीचं तुकडं करीत राहिलं, त्या तुकड्यांकड बघत शिवराम बसून होता. बाप्पांचं बोलणं ऐकून त्याला वाईट वाटलं पण तो आपल्या निर्णयाशी ठाम होता आपलं म्हणणंच बाप्पाना चांगल्याप्रकारे कसं पटवून द्यावं याबद्दल तो मनात शब्दाची जुळवा-जुळव करीत होता. त्याची आई जेवण घेऊन आली तेव्हा दोघं उठलं. पाय धुवायला ओढयात उतरताना बाप्पा म्हणालं ' चार दिवस नीट विचार कर. म्होरचं आयुष्य डोळयापुढं आण. तू शिकला न्हाईस नि जयराम शिकला तर दोघांच्या म्हाणीमानात आंतर पडल. तुला मानहावी वाटलं. पस्तावा हुईल ही येळ पुन्हा येणार न्हाय. बाण सुटला की की परत हातात येत न्हाय. तू विचार कर. सातायात खोली घे. आमची काळजी करू नकोस. शिकवण्या लाव. लागत्याली तेवढी बुकं घे. घराकडं ध्यान न देता अभ्यासात डोकं चाल. पैशाची काळजी करू नको काय म्हणतो मी ?" "मला जमणार नाय.' 6 4 तुला काय जमंल ?" शेती करीन मी.' 4 • शिक्षणासाठी अभ्यास करावा लागतो तसं शेतीसाठी कष्ट.. रानवारा । १८