पान:रानवारा.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विचाराने तो अधिकच उदास होत असे. त्यानं दहावीची परीक्षा कशीतरी आटोपली. इतर पोरांसारखा तो निकालाकडं डोळं लावून बसला नव्हता. शेतात रमून गेला होता. तो जेमतेम पास झाला. पण त्याबद्दल कसलंच सुखदुःख त्याच्याजवळ नव्हतं. पुढील शिक्षणाबद्दल गावातली इतर मुलं सातारला चकरा मारू लागली. त्यानी कॉलेजात प्रवेश घेतले तरी याची काही हालचाल दिसेना, तेव्हा बाप्पांनीच त्याला म्हटलं, 'शिवराम तूबी सातारला जाऊन येकी.' • कशाला ? " C कोण घेणार ? कालीजात नाव दाखल करायला नको का ?' जागा भरल्यम्हंजी ‘ना घेऊद्यात ' ह्येला काय म्हंत्याती ? कुठल्या कालीजात जाणार तू ?' • मला नाय जायचं कुठं.' म्होरं शिकायचं नाय का तुला ?? • नाय शिकायचं.' ‘ का ?" 6 6 शेती करणार मी.' • मी करतूयाच की ' पण यापुढं मी करणार.' ' का ? माझं हातपाय गळ्यात आलं व्हय ? मला शेती जमंना व्हय?' " तसं मला म्हणायचं नाथ, बाप्पा • मग काय म्हंतोस ?" • बाप्पा, मला पुढचं शिक्षण झेपायचं नाय.' • पैसा कमी पडलं आसं वाटतं का ? आरं तुला कोण बालीस्टर हुयाचंय तर हो की. घरदार, जमीन जुमला कशाची पर्वा करणार नाय. तुला पायजे तेवढा पुरवीन ते खरंय. पण मला म माझं डोक चालत नाय. अभ्यासात ध्यान लागत नाय. म्हणून तर कमी मार्क पडली. कसातरी . रानवास । १७