पान:रानवारा.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोणीच घेईनासं झालं. गाईच्या कळपात वासराची दाद घेऊ नये तसं झालं. शिवराम दुखावला. त्याचं मन नको इतकं हळवं झालं. रानात झाडावर बसलेलं एखादं एकटंच रानपाखरू दिसलं की त्याला आपली व त्याची स्थिती एकच वाटे. पाखरू झाडावरून उडून जाईपर्यंत तो त्याला विव्हळ होऊन उदासपणे पहात राही. रोज रात्री अंगणात शेजारी-पाजारी गोळा होत. बाप्पाचं दोस्त येत. तोच जयरामचा विषय चर्चेला असे. जयरामचं कौतुक शब्द वेगळं पण आशय तोच जयरामचा माथा उजळला होता. मळलेल्या नितळ पायवाटसारखं त्याचं नांव आणि आपण दोन्ही बाजूच्या खुरट्या गवतासारखं सगळी त्याचं कौतुक करताना त्याची तुलना शिवरामशी करीत त्यामुळं त्याचा विचार असा उलट वळण घेऊन वेगानं धावू लागला याचा कुणालाच थांग नव्हता. वावटळीत सापडलेला पाचोळा आकाशास भिडावा, तसं त्याचं मन सैरभैर झालं होतं. जयरामच्या पुढच्या आयुष्याचं चित्र इंद्रधनुष्यासारखं अनेकांनी रंगवलं पण शांत जलाशयासारखं शिवरामचं मन तळापासून ढवळून निघालं. C आपलं शिक्षणाकडं ध्यान लागलं नाय. आज हे आसं होऊन बसलं याला कोण जबाबदार ?" तो गढळलेल्या मनान चाचपडून उत्तर शोधू लागला. त्यानं खूप विचार केला. पण त्याला त्यात घरच्यांचा काहीच दोष दिसून आला नाही. नकळत तो स्वतःचाच शोध घेत होता. त्याला त्याच्या मनाच्या एका नव्याच पैलूचा शोध लागला आपल्याच गावातल्या जागृत देवस्थानाची नव्यानेच माहिती मिळावी तसं त्याला वाटलं. तो शाळा शिकत होता. पण शाळेच्या आवारापेक्षा मोकळया शिवारातच अधिक फुलून यायचा. प्राथमिक शिक्षण असंच खेळता-खेळता पार पडलं माध्यमिक शिक्षणाच्या बाकड्यावर त्याला अवघडल्यासारखं वाटू लागलं. शिक्षक शिकवत असलं तरी त्याचं लक्ष खिडकीबाहेर असायच गाई-गुरं शेताकडं चाललेली असायची, त्यांच्या गळ्यातल्या घंटा निनादत असायच्या त्या आवाजाच्या सोबतीनं त्याच मन शिवारात पोचायचं साऱ्या पिकात उंडारायचं विहिरीवरून ऊसात. ऊमातून पेरूच्या बागेत, तेथून कांद्या-लसणाच्या वाफ्यात, रानमेव्याच्या मस्त गधात मुक्त भटकायचं. रानवारा । १५