पान:रानवारा.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असला की, बाप्पा सारी कामं सोडून गाडीत बसायचं कौतुकानं म्हणायचं, ' गाडी धावायला लागली की मला काय समजतच नाय की, बैलास्नी आवरावं की गाडीवानाला ? गाडी वान्यासंग धावती निस्ती.' पण बैलगाडीच्या शर्यतीत ते कधीच शिवरामाला भाग घेऊ देत नसत. ते असं कळवळून त्याची समजूत घालत की त्याला त्यांचं मन मोडणं जमतच नसे. ' तुझ्या शर्यतीतल्या पैल्या नंबरापेक्षा मला तुझा जीव लई मोलाचा वाटतो. शिवराम येळकाळ सांगून येत नाय. माझं ऐक. माझ्यासाठी येवढंच कर बाबा.' त्यांच्या अशा मायेच्या लोटात शिवराम अवाक् व्हायचा. बाप्पांचा शब्द तो मोडायचा नाही. ते दिवस मध भरलेल्या मोहळाच्या पोळीसारखं गोड. मधुर कुठंच कडवटपणा नव्हता; पण त्याच्या धाकट्या भावाच्या-जयरामच्या परीक्षेचा निकाल लागला आणि घरात कधो नव्हता इतका उत्साह आला. जो तो जयरामच्या मार्कांची वाहवा करू लागला चोहोबाजूनी कौतुकाचा वर्षाव त्याच उत्साहाच्या भरात बाप्पांनी शिवरामला पाठवून आक्काला माहेरी आणली सारी जयरामच्या पुढच्या शिक्षणाचं बोलत असायची. पहिल्या- पहिल्यांदा शिवमही त्या चर्चेत भाग घेत होता; पण नंतर त्याला कुठंतरी खटकू लागल. जयराम बक्कळ मार्कानी पास झाला होता त्याला इंजिनियर करायचा होता. पुढच्या शिक्षणासाठी त्याला मुंबईला ठेवायच होता. इथपर्यंत त्याला सारं ठिक वाटलं; पण जयरामच्या बुद्धीचं कौतुक करताना कळत-नकळत घरच्यांनी व बाहेरच्यांनीही तुलना सुरू केली. गप्पा रंगायच्या, वाढायच्या कौतुकानं जयरामचं पारडं जड व्हायचं, शिवरामचं पारडं हलकं होऊन हेलकावं खायचं. शिवरामचं मन वैशाखातल्या उन्हानं शेत भेगाळतं तसं भेगाळलं. मायेच्या ओलाव्याला आतुरलं तो उदास राहू लागला. बाप्पा जयरामच्या पुढच्या शिक्षणाच्या तजविजीत होत. जयराम अर्ज, प्रवेश, पत्रव्यवहार, फी सवलती वगैरेच्या व्यापात दंग झालेला होता. त्यालाही आपल्या मोठ्या भावाजळ बसून मनमोकळ्या गप्पा माराव्यात असं वाटलं नाही. घरात आई आणि आजीपण जयरामच्या शिक्षणाच्या गप्पांकडं कान लावून असायच्या. त्याच्या खाण्यापिण्याची चौकशी अधिकच केली जायची या सान्यात शिवरामची खास दाद रानवारा । १४