पान:रानवारा.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

TU FITTS अपराधल्यासारखं व्हायचं. मान खाली जायची. आपोआप. एखादं टेबलंही कधी रिकामं नसायचं. बऱ्याच जणांच्या खुर्चीमागं मेंबर नंबर लावून उभा असायचा. तोही एका खुर्चीमागं नंबर लावून उभा रहायचा. आपण पोट भरायला इथं आलो. पोटाच्या मागं लागून इथं आलो; म्हणून जेवणाराच्या खुर्चीमागं उभं राहून नंबर लावून जेवतो. असलं दरिद्री विचार मनात कावकाव करायचं. पोटातली कावकाव थंड व्हायची. खुर्चीवरचा माणूस उठून हात धुवायला गेला. तरी त्याला भान नसायचं. बरोबर आलेला संभा त्याला धक्का मारायचा. तो ओशाळवाणं हसायचा. झोपेतून जाग आल्यासारखा इकडं तिकडं पहायचा. मलूल चेहऱ्यानं खुर्चीवर बसायचा. भात चिवडत रहायचा. कधी कधी खुर्चीमागचा मेंबर खोकून आपल्या नंबराची जाणीव द्यायचा. मग तो घासामागून घास भराभर घ्यायचा. जेवण संपवून उठताना त्या मेंबराकडं चोरट्यांसारखं पाह्यचा. नजरानजर झालीच तर आणखी अपराधी भावना. खानावळीतून बाहेर पडताना पोट भरल्याच्या जाणीवेपेक्षा सुटकेची जाणीव अधिक खोलवर उमटायची. हे सारं त्याच्याच हट्टामुळं घडलं. सारं सुरळीत चाललं होतं. पाटानं पाणी जितक्या सहजतेनं जावं तितक्या सहजतेनं तो रोज भल्या पहाटं तालमीत व्यायाम करायचा गावच्या विहिरीवर आंघोळ करायचा. तिथून पुढं त्याचं मळयातलं काम सुरू व्हायचं. शाळा सोडल्यापासून यात खंड नव्हता. बाप्पांच्या बरोबर तो सारं शेतीचं व्यवहार बघायचा. शेतीचं सामान, बी-बियाणं आणायला बाप्पांच्या बरोबर त्याच्या अधूनमधून सातारला चकरा व्हायच्या आसपासच्या गावची जत्रा आली की तो तयारीनं तिथं हजर रहायचा. कुस्तीच्या फडात उतरायचा. फड जिंकून ढोल-लेझीमाच्या गजरात गावात यायचा. त्याची आवका किंवा आई त्याला ओवाळून घरात घ्यायची. कधी कुस्ती हारायचाही. अशावेळी बाप्पांचा पाठीवरून हात फिरायचा. तोच कसा चपळाईनं खेळतो हे सांगून व्हायचं. पुढच्या फडासाठी चांगली तयारी करावी म्हणून भरीस घातलं जायचं. आणि अनुभव असा की, पुढच्या फडात तो हमखास कुस्ती जिंकायचा. मोटंत पाणी मावत नाही, असा अंगात हुरूप असायचा. दावनीला दोन जातीवंत, दमदार बैल होती गाडीशन म्हणून शिवराम रानवारा । १३