पान:रानवारा.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेऊन सोडावं आणि त्या कल्पनेनं त्याच्या ओठावर हसू फुटलं. तो पाण्यावर वाकला. गळ्यातल्या गोफातला मारूती लटकू लागला. सहजच त्याची नजर पाण्यातल्या प्रतिबिंबावर गेली. नाक जास्तच वरती आल्यासारखं, डोळं खोल गेलेलं आणि खांद्याजवळचं हाड नजरंत भरण्या- इतकं वरती आलेलं. एक सुस्कारा टाकून त्यानं चेहऱ्यावर पाण्याचं तीन-चार हबकं मारलं; पण तेवढ्यानं त्याच समाधान होईना पाण्यात मनसोक्त डुंबावं असा विचार करून त्यानं कपडे काढून पायरीवर ठेवलं. पाण्यात सूर मारला. तरंगणारा माशांचा थवा दोन्ही बाजूला विभागला गेला. ओल्या अंगानं तो धावंवर आला, तेव्हा त्याचं डोळं पोहण्याच्या अतिरेकानं लालसर झालं होतं. हौदाच्या दगडावर अंगावर ऊन घेत तो उभा राहिला. अंगावरच पाणी निथळत होतं. डोक्याचं ओलं केस तो हातानं निरपून कोरडं करीत होता. मनात म्हणत होता, 'बरं झालं अंग धुतलं. बाप्पाच्या नजरंला माझा दमदारपणा नाय दिसला तरी ताजापणा दिसलं. तेवढंच त्यांना समाधान. ' वाऱ्याची गार झुळुक अंगावरून गेली. अंगावर हलकाच काटा फुलला. गोड शिरशिरी रोमरोम मोहरलं. शहारलं. हा अनुभव गेल्या दोन महिन्यात त्याला मिळाला नव्हता. दोन खणाच्या खोलीत ते सहाजण रहात होतं; नव्हे थोडा वेळ अंग टाकायला येत होतं. रात्रपाळी-दिवसपाळीनं त्यांची थोडी सोय होत होती. मुंबापुरी न्हवे बजबजपुरी. दिवसभर अंगाला घामाचा पाझर फुटलेला. त्याची चिकट-घामट जाणीव मनात बाळगून दिवसभर वावरायचं. सारा हुरूप जणू घामात भिजत ठेवलेला. आंघोळ, जेवण, नोकरीसाठी वणवण आणि झोप या कशातच घामट जाणीव पाठ सोडत नव्हती. एका बादलीत आंघोळ उरकायची. लोकल पकडायचा, कारखाना, गिरणी जो पत्ता दिला असेल तो धुंडायचा. तेथील ऑफीस शोधायचं. तीच तीच माहिती- चौकशी आणि निराशेचा खड्डा आणखी खोल खणणारा तोच तोच नकार. खानावळ चा अनुभव तसाच. वखवखलेला कोपरा अपरिहार्य अटळ. पोटाचं अस्तित्व तिव्रतेनं जाणवायचं. रानवारा । १२ माणसाच्या आयुष्याचा एक दिवसातून दोनदा शरीरातील खानावळीत शिरताना उगीच