पान:रानवारा.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

1pp २ रानवारा वस्तीच्या थांब्यावर गाडी थांबली. खाली उतरताना शिवरामानं राजा गुरवाला आपलं सामान गावात परसूच्या हॉटेलात ठेवायला बजावून सांगितलं. खाली उतरून त्यानं सभोवती पाहिलं. खाटकन् दरवाजा बंद केल्यावर गाडी धूळ उडवीत निघून गेली, तेव्हा रूमालानं तोंड पुसून शिवराम माळयाच्या विहिरीकडं वळला. त्यानं विहिरीत डोकावून पाहिलं. चवथ्या पायरीपर्यंत तुडुंब पाणी होतं. निवळशंक, स्वच्छ अगदी तळ दिसत होता. नजरेलाच पाण्याचा थंडगारपणा जाणवत होता. एक लहानगा निळा पक्षी हलकीशी शीळ मारीत विहिरीच्या चिरेतून भरारला, उंच हवेत झेपावला आणि शिवराम उगाचच निळया आकाशात उंच उंच नजर पोहचते, तिथंपर्यंत पहात राहिला. त्याच्याही ओठावर हलकीशी शोळ आली. एका भयानक स्वप्नातून जाग येऊन वाटावं, असा त्याच्या मनाला आल्हाद वाटला विहिरीच्या कमानीतून पायऱ्या उतरत पाण्यात दोन पायऱ्या उतरून तो उभा राहिला. काठाशी आलेलं कासव हलकेच खाली झेपावलं. मंद मंद, शिवरामच्या मनात आलं, या कासवाला मुंबईच्या मरीन लाईनवर