पान:रानवारा.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुरणपोळीच निवेद ती थडग्याला देत होतीं. खरं तर खंड्याला पुरणपोळी आवडत होती; पण माझ्याशिवाय तो कधीच पुरणपोळी खात नव्हता. हा पुरणपोळीचा निवेद त्याला न्यावा का ? का नेवू नाय ? माझीं मळ्याच्या वाटेवरील पाऊलं माळाच्या वाटेनं पडू लागली. अधिक वेगानं. हिरवंगार जित्राब वाऱ्यानं डुलत होतं. उभ्या पिकाला वाकवीत वारा रानभर हुंदाडत होता. आपण भवन्यासारखा गिरकी घेत होता नि जित्राबाचा भवरा करीत होता माझ्यासंगती खंडयापण असाच हुंदाडायचा माझ्याभवती फिरून माझ्या अंगाचा भवरा करायचा. वाटलं हलणाऱ्या डुलणाऱ्या जित्राबात खंड्या कुठंतरी आसंल. आत्ता हाक मारली की धावत येईल. ... चिलया बाळागत ! नि मीं कसनुसा हसलो. माळावरच्या खड्डयात, जिथं खंड्याला पुरला होता, तिथं पुन्हा एकदा मन घायाळ होऊन घिरट्या घालू लागलं. . तिथं डोळ्यांना फक्त खड्डा दिसला. सुन्न उभाच व्हायलो. तो खड्डा माझ्या छातीत पडलाय. तिथं खंड्याच्या आठवणी पुरल्यात. न उकरता त्या झन्याच्या पाण्यासारख्या वर येतात, आसं मनापासून वाटलं, तिथल्या उंच दगडावर बसून न्हापलो. वाटलं. खंडया गेल्यापासून मी पोरका झालो. माझ्याशी खेळणारं, मला समजून घेणारं, माझंच ऐकणारं या जगात कोणीच नाय. खंड्यासारखा जीव लावावा आसंही कुणी नाय. खंड्याची आठवण काळीज पोखरू लागली कढ कंठात दाटून आलं. मनात मध्वनात म्हणून बोलू लागलो 'खंडया ऽऽ. खंडया. ही आईनं दिलेली पुरणपोळी मी तुझ्याकडं घेऊन आलो रं. थडग्याला नाय दिली. मला ठावं हाय, तुला आवडती म्हणून खंडया. तू माझ्यावर रागावलास ? मग तू मला माया का लावून गेलास ? मी तुला कसा विसरू सांग ? माझ्याच चुकीमुळं तुला मरावं लागलं म्हणून रागावून गेलास ? .. पणपण तू तर मला सोडून कुठंच जात नव्हतास, मग का गेलास ? . • खंड्या मला तुझा विसर पडत नाय रं मी जवळ नसताना तू गेलास खंड्या मी तुला नकोसा झालो होतो का रं ? पायाला गार-गार लागलं. दचकून गुडग्यातली मान काढली. बघितलं कुठलं तरी कुत्र्याचं पिलू माझं पाय चाटीत होतं. ( शिवाजी विद्यापीठ पारितोषिक विजेती कथा १९८० ) खंडचा ।१० - ... ०००