पान:रानवारा.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मला आग्रह करून जेऊ घालत होती. पण खंड्या मरणार होता, म्हणून कोणी दुःखी झालं नव्हतं. ताटावरचा हात कोणी आखडला नव्हता. ज्यानं आखडला त्याला आग्रह चालला होता.... आणि मी सुद्धा जेवत होतोच की, खंड्यानं मला सोडून कधी भाकरी खाल्ली का ? मी पाण्याचा तांब्या उचलला नि हातावर बदाबदा पाणी ओतलं. सारं जेवण पाण्यात मिसळून गेलं. मी पुन्हा झपाटल्यासारखा खांबाला टेकून बसलो खंड्याच्यासमोर ! खंडचाकडं एकटक पहात डोळचातून आसवं ओघळत राहिली . मेणबत्तीच्या आसवांसारखी. ...● आबा केव्हा आलं कळलंच नाही. म्हणालं, 'चल, आज तू माझ्याजवळ झोपायचं.' माझी आज्ञाधारक पावलं त्यांच्या पाठोपाठ जिना चढून गेली. आबांच्या पुढ्यात मला झोप लागली नाय. पण त्यांच्या पुढचात्न उठायचं धाडसपण मला झालं नाय. किती तरी उशीरानं मला थोडी झोप लागली होती. मी स्वप्न पाह्यलं होतं स्वप्नात मी खंड्याबरोबर डोंगरावर उंच उंच गेलो. एका उंच कड्यावर दोघं उभं होतो पण काय झालं कुणास ठाऊक एकाएकी खंड्या उंचावरून ...त्या उंच भयावह कड्यावरून खोल खोल अंधारात कोसळला मी खाली वाकून पाह्यलं पण तो कोठेच दिसला नाही मला मात्र भीती वाटली. घाम आला. रडू आलं. घशात अगदी दुखायला लागलं नि मला जाग आली. पहाट झाली होती. कोंबडा आरवल्याचा आवाज आला. घरामागच्या चिंचेवर कावळ्यांची कावकाव ऐकू येत होती अंथरूणातून हळूच उठलो. पावलं न वाजवता जिन्यापर्यंत आलो मग मात्र दोन दोन पाय-या उतरत खाली आलो. तडक खंड्याकडं गेलो. त्याला झोप लागली होती, मी हाक मारली - ‘खंड्या ऽऽ' .. पण तो हाललासुद्धा नाही. त्याचे चारी पाय ताठ झाले होते. मनात काहीतरी विखारी वळवळ झाली. खंडया कधी असा झोपत नसे. मी घायाळ नजरेनं त्याला न्याहाळलं माझा खंचा मला सोडून गेला होता. छे ! तो कुठं गेला मला सोडून ? मीच तर त्याला सोडून माडीवर गेलो होतो. दुष्ट मी. माझ्या खंड्याचा जीव जाताना मी माडीवर आबांच्या कुशीत सुखरूप गळा दाबावा ... माझा कोणीतरी असं कुठं घडतं ? खंड्या | ८ जाग किंवा झोपलेला. वाटलं कोणी नाही तरी माझा मीच. छे ! .... ..